राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गुहा येथील एका ३० वर्षिय तरूणीने भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वारात विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्र...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गुहा येथील एका ३० वर्षिय तरूणीने भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वारात विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी 12 वाजता गुहा येथील 30 वर्षीय तरुणी ही राहुरी येथील भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभी असताना सोबत आणलेली विषारी औषधाची बाटली काढून सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या तरुणीस तातडीने राहुरी फँक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
नेमकी कोणत्या कारणावरून तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे मात्र समजू शकले नाही.
विवेकानंद नर्सिंग होमच्या वैद्यकीय सुञांनी विषारी औषध सेवन केल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्यात कळविली आहे. सायंकाळ पर्यंत पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.
'ते'दोन तरुण सकाळपासून 'त्या' तरुणीच्या सोबतच,चर्चेला उधाण
सदर तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नापासून ते तिला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन येईपर्यंत व रात्री उशिरा विवेकानंद नर्सिंग होम येथे तरूणीवर उपचार सुरू असतानाही तिच्या सोबत असलेले 'ते' दोन तरुण कोण? व कुठले? याबरोबर 'त्या'तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याबाबत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत