कोपरगांव/वेबटीम:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागच्या प्रयत्नाने देशातील नामांकित कंपन्या मध्ये विद्यार्थ्यां...
कोपरगांव/वेबटीम:-
संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागच्या प्रयत्नाने देशातील नामांकित कंपन्या मध्ये विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड होत असुन अलिकडेच धुत ट्रांसमिशन प्रा. लिमिटेंड या आघडीच्या कंपनीने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील ६९ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की वायरींग हार्नेस, इलेक्ट्राॅनिक सेन्सर्स आणि कंट्रोलर, ऑटोमोटिव्ह स्वीचेस, पावर कार्डस्, ऑटोमोटिव्ह केबल्स, कनेक्टर आणि टर्मिनल्स, २ व्हीलर, ३ व्हीलर कमर्शिअल , शेती उपकरणे, वैद्यकिय उपकरणे, इत्यादी उत्पादन करणाऱ्या धुत ट्रांसमिशन प्रा. लि. कंपनीने पुढीलप्रमाणे विध्यार्थ्यांच्या निवडीचे पत्र दिले आहे. आदिती जगताप, निकिता सोनवणे, मिताली चव्हाण, अभिजीत सोनवणे, अमृता घालमे, हर्षदा जगदाळे, जयश्री भागवत, रूपाली गेरकर, समिक्षा सोनटक्के, प्रतिक्षा घोलप, प्रगती थोरात, मृणाली जगताप, रिया माळी, मयुरी क्षिरसागर, प्रेरणा चंदन, वैष्णवी गुंजाळ, ओमकार तनपुरे, प्रगती साळुंके, निकिता डांगे, गितांजली आखाडे, निशिगंधा काळे, पल्लवी सोजवळ, अंजली जगताप, आदित्य अव्हाड, भाग्यश्री विघे, जयश्री बनसोडे, आकाश गाढवे, पुणम रिठ्ठे, दिपाली आहेर, पुजा बारे, आरती गवळी, कोमल हाडके, आरती पवार, पोर्णिमा कुलकर्णी, कोमल कदम, अंकिता जुंजार, रोहिणी बाचकर, कोमल गायकवाड, नंदिनी साळवे, गौरी कदम, सचिन मांडूडे, शुभम तांबे, धनश्री वाघ, विशाल वाघ, वैभव चव्हाण, प्रमोद खोडपे, दिपक खेमनार, आकाश शेटे , आकाश पुरी, प्रकाश मार्के, निशांत कुलकर्णी, ऋषिकेश मोटे, शेखर निरपणे, ऋषिकेश वैराळ, किरण शेळके , सिध्दार्थ भाबड, शंतनू भाबड, गौरव शिंदे , शीतल गवळी, भारती राशिंकर , वैदेही भालेराव, कोमल बुल्हे, धनश्री जोशी , कोमल राजपुत, आकाश उगले, तेजस दोषी , अक्षय साखरे, स्वप्नील साळुंके व अक्षय थोरात.
निवड झालेले बहुतांशी विद्यार्थी हे ग्रामिण भागातील असुन संजीवनीच्या प्रयत्नांमुळे त्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत