नगर मनमाड महामार्गावरील खडडे त्वरीत न बुजविल्यास १५ ऑक्टोंबरला येवला टोल नाका बंद पाडु-साहेबराव रोहोम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर मनमाड महामार्गावरील खडडे त्वरीत न बुजविल्यास १५ ऑक्टोंबरला येवला टोल नाका बंद पाडु-साहेबराव रोहोम

कोपरगांव :- प्रतिनिधी     नगर मनमाड प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक ८ ची पावसामुळे दुरावस्था झाली असुन त्यावर मोठ मोठे खडडे पडुन अपघातात अनेक ...

कोपरगांव :- प्रतिनिधी

   नगर मनमाड प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक ८ ची पावसामुळे दुरावस्था झाली असुन त्यावर मोठ मोठे खडडे पडुन अपघातात अनेक निरपराध व्यक्तींचे बळी जात आहे, शासन व या मार्गाची देखभाल दुरुस्ती करणारे नागपुरचे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी बघ्याची भूमिका घेत आहे तेंव्हा हे खडडे तातडींने न बुजविल्यास १५ ऑक्टोंबरला येवला टोलनाका बंद पाडु असा इशारा कोपरगांव तालुका भाजपाचे अध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला. मुदतीत रस्ता दुरूस्त न झाल्यास मृत पावणा-या व्यक्तींची जबाबदारी संबंधीत कंपनीवर ठेवुन त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवु असे विश्वासराव महाले म्हणाले.



  सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव महाले, संचालक प्रदिप नवले, भास्करराव भिंगारे, कामगार संचालक वेणुनाथ बोळीज, माजी सभापती सुनिल देवकर, युवा नेते सचिन दत्तात्रय कोल्हे, नाटेगांवचे सरपंच विकास मोरे, संदिप देवकर, डॉ. गोरख मोरे, सुभाष शिंदे, बापू सुराळकर, बाळासाहेब चांदर, बाळासाहेब महाले, येसगांवचे सरपंच पुंडलिक गांगुर्डे, दिनेश कोल्हे, वसंतराव बोळीज, अंबादास लक्ष्मण देवकर, निलेश वराडे, विष्णु बोळीज, सोपानराव शिंदे, निवृत्ती रोहोम, प्रशांत सुराळकर, बाळासाहेब निकोले यांच्यासह येसगांव, टाकळी, खिर्डीगणेश, ओगदी, आंचलगांव, बोलकी, नाटेगांव या पंचकोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी, प्रवासी आदिंनी नगर मनमाड महामार्गावरील कोपरगांव तालुका हददीतील येवला टोलानाका येथील अभियंते शांतीलाल शिंदे यांच्याशी बुधवारी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत रस्ता दुरुस्तीचा जाब विचारला.


           कोपरगांव तालुका हददीतील नगर मनमाड महामार्गाची पावसामुळे दुरावस्था झाली, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढुन निरपराध व्यक्तींचे बळी मोठया प्रमाणांत जात आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना त्याचा त्रास होवुन अनेकांना पाठदुखी, कंबरदुखीचे आजार जडले आहेत. तर अनेकांचे हाय पाय मोडुन ते कायमचे जायबंदी झाले आहेत.



            श्री. साहेबराव रोहोम पुढे म्हणाले की, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी याबाबत अनेकवेळा जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे रस्ता दुरूस्तीची मागणी केली आहे. रस्त्या या टोल वसुलीची जबाबदारी नागपुरच्या विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे आहे त्यांनाही अनेकवेळा निवेदने दिली पण संबंधीत अधिकारी थातुरमातुर मुरूम टाकुन खडडे बुजवितात त्यातुन अपघातांचे प्रमाण वाढुन असंख्य दुचाकीस्वराचे डोळे कायमचे निकामी झाले आहेत. श्री. विश्वासराव महाले यांनी याबाबतची सर्व वस्तुस्थिती अभियंते शांतीलाल शिंदे यांना सांगितली. प्रवाशांच्या व पंचक्रोशीतील रहिवासीयांच्या तीव्र भावना असुन या महामार्गावरील खडडे पकक्या खडीने न बुजविल्यास १५ ऑक्टोंबर २०२१ रोजी येवला टोलनाका बंद पाडू यातुन     होणा-या नुकसानीची जबाबदारी सर्वस्वी कंपनीची राहिल असा इशारा दिला. शेवटी संचालक प्रदिप नवले यांनी आभार मानले. ईस्माईल शहा यांनी निवेदन स्विकारले.

            कोपरगांव तालुका हद्दीतील नगर मनमाड महामार्गावरील खड्डे त्वरीत न बुजविल्यास १५ ऑक्टोबर पासुन येवला टोल नाका बंद पाडु या आशयाचे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी बुधवारी दिले. याप्रसंगी विश्वासराव महाले, संचालक प्रदिप नवले, भास्करराव भिंगारे आदि उपस्थित होते.

1 टिप्पणी

  1. रस्ते आत्ताच खराब झाले ka...???
    इथून मागील 5 वर्षात आपल्याला दिसायला कमी होते ka???????? याचं आधी जनतेला उत्तर द्या mg प्रश्न विचारा........

    उत्तर द्याहटवा