देवळाली प्रवरात तिथिनुसार हजरत शहा दावल मलिक बाबा यांचा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात तिथिनुसार हजरत शहा दावल मलिक बाबा यांचा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न

देवळाली प्रवरा(वेबटीम):- येथील हजरत अब्दुल लतीफ शहा दावल मलिक बाबा रहैमतूल्लाहअलै यांचा तिथी नुसार उर्स व मोहरमचा चाळीसावा निमित्त देवळाली य...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-


येथील हजरत अब्दुल लतीफ शहा दावल मलिक बाबा रहैमतूल्लाहअलै यांचा तिथी नुसार उर्स व मोहरमचा चाळीसावा निमित्त देवळाली येथे हजरत अकीलबाबा यांच्या मार्गदर्शन व खादिम कमिटीच्या नियोजनात शानदार कार्यक्रम व लंगर मोठया उत्साहात सोमवार दि. २७/०९/२०२१ रोजी दावल मलिक बाबा देवळाली प्रवरा आंबी स्टोर येथील दर्ग्यात पार पडले, दरम्यान असंख्य भाविक भक्तांनी दर्शनानंतर महाप्रसाद व कव्वालीचा आस्वाद घेतला,


महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फनकार तथा कव्वाल औरंगाबाद येथील आमीर उझ जामा व ग्रुप ने कव्वाली सादर केली उपस्थित भक्तांनी मनसोक्त कार्यक्रमाचे आस्वाद घेतला.


   सोमवार ऊर्समधील कुरानख्वानि ‘चिरागा’ (दीपोत्सव) व 'संदल' महाप्रसाद व कव्वालीचा धार्मिक मुख्य कार्यक्रम पार पडला. 

  त्यानिमित्त दर्गाह परिसरात भव्य विद्युत रोशनाई व सजावट केली, दरम्यान हजरत शहा दावल मलिक बाबांच्या पवित्र समाधीवर चंदनाचा लेप देऊन फुलांची चादर अर्पण करण्यात आली. नंतर फातेहाखानीचा विधी पार पडला. महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यातील भाविक राहूरी तालुक्यातील देवळालीत शहरात आले होते. देवळाली प्रवरा गावापासून चार किलो मीटर अंतरावर हजरत शहा दावल मलिकबाबांचा प्रसिद्ध दर्गाह आहे. हिंदू-मुस्लिमांसह अठरा पगड जातींचे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून दावल मलिकबाबांचा दर्गाह प्रसिद्ध आहे. दर्ग्याच्या सर्वासर्वे हजरत अकिलबाबा दर्ग्याची मनोभावे सेवा करतात ऊर्सनिमित्त तसेच दररोजच अनेक भाविकांची दर्शनासाठी रेलचेल कायमच सुरू असते. सोमवारी सकाळी जियारत तर सायंकाळी संदल, महाप्रसाद व कव्वालीचा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडल्याचे दर्ग्याचे प्रमुख हजरत अकिलबाबा पटेल यांनी सांगितले

 तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी देशात एकता, अखंडता व सर्व समाजबांधव एकदिलाने राहून देशाप्रती राष्ट्राभिमान तेवत ठेवून समाजहित कार्यास सतत पुढाकार घेत राहावे असे प्रार्थना करून कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी अनेक भाविक उपस्थित होते.ख़ादिम कमिटी मधील जनुभाई शेख, प्रा.मुरलीधर तांबे सर, बाळू मामा जोशी, जावेद तांबोळी, सतीश क्षिरसागर,अप्पसाहेब शेटे,राहुरी पंचायत समितीचे माजी सभापति सुरेशअप्पा नीमसे, पत्रकार तथा छत्रपति शिवाजी मुस्लिम बिग्रेडचे राहूरी तालुकाध्यक्ष जावेद सय्यद,  पत्रकार समीर माळवे, देवळाली जमा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष उमर इनामदार, अल्ताफ इनामदार, तनवीर इनामदार, भैया इनामदार, आदिल इनामदार, डॉ. प्रशांत नालकर, सचिन नालकर, रविंद्र पेरणे, रमेश गाढ़े, रशीद सय्यद, आशिष ढेरे, नवनाथ क्षिरसागर,मुसाभाई शेख, शाकिर तांबोळी, बशीरभाई शेख आदि भाविक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत