संगमनेर(वेबटीम):- भंडारदरा धरणातून आज रात्री ९ वाजता १२१०४ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर निळवंडे धरणातून आज रात्री ९ वाजता १६०...
संगमनेर(वेबटीम):-
भंडारदरा धरणातून आज रात्री ९ वाजता १२१०४ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर निळवंडे धरणातून आज रात्री ९ वाजता १६०१३ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.. भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्याने रात्री २० ते २५ हजार क्युसेकनेपर्यंत विसर्ग वाढण्याची शक्यता आहे..
प्रवरा नदीकाठी असलेल्या सर्व गावांतील नागरीकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता उर्ध्व प्रवरा धरण विभाग संगमनेर व स्थानिक महसुल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर येथील धरणातून गोदावरी नदी पात्रात सद्यस्थितीत २३,९०५ क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत