नॅशनल टी.बी.कंट्रोल प्रोग्राॅम अंतर्गत डाॅ.गर्जे बाल रूग्णालयात २३५५८ मुलांची मोफत तपासणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नॅशनल टी.बी.कंट्रोल प्रोग्राॅम अंतर्गत डाॅ.गर्जे बाल रूग्णालयात २३५५८ मुलांची मोफत तपासणी

  कोपरगाव प्रतिनिधी  भारतात लहान मुलांच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.केंद्र शासन महाराष्ट्र शासन विविध उपाय योजना करत असते.लहान मुलांचे आजाराच...

 कोपरगाव प्रतिनिधी 



भारतात लहान मुलांच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.केंद्र शासन महाराष्ट्र शासन विविध उपाय योजना करत असते.लहान मुलांचे आजाराचे निदान लवकर होत नसते. 


त्यामुळे मुलांच्या आजाराचे प्रमाण वाढत असते.मुलामध्ये विविध आजार वाढत आहे.विशेषतः क्षयरोग ,या रोगाचे निदान झाल्यास उपचार करता येतात.क्षयरोग ( T.B) या आजाराने लहान मुले दगावली आहे.केंद्रशासनाच्या नॅशनल टी.बी.कंट्रोल प्रोग्रॅम यांच्या वतिने साथी या संस्थेला लहान मुलांच्या क्षयरोग या आजारासंदर्भात निदान, उपाय योजना तपासणी उपचार असे कामकाज सोपविले.या संस्थेच्या माध्यमातून देशातील दोन राज्य निवडली गेली.




त्यात महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली.महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भाग म्हणून कोपरगाव येथील डाॅ.गँर्जे बाल रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. डाॅ.गर्जे यांनी कमी वेळात २३५५८ असे विक्रमी बालकांची क्षयरोगाची तपासणी केली आहे.त्यात सर्दी,खोकला , वारवारं ताप येणे , 3 आठवडे पेक्षा जास्त खोकला ,वारंवार सर्दी,रात्री घाम येणे, शारीरीक वाढ कमी होणे.असे संशयित 23% संयशित बालके आढळून आली होती.  



  २३५५८ तपासणी केलेल्या बालकामध्ये ९ बालके क्षयरोग ग्रस्त आढळून आली आहे. याकामी नगर येथील जिल्हा क्षयरुग्ण निवारण विभाग चे अधिकारी  त्याच बरोबर ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथील श्री मगरे साहेब (टेक्निशियन)व गर्जे बाल रुग्णालय तील स्टाफ यांचे याकामी सहकार्य लाभले. ज्या   कुटुंबीयांनी यां प्रकल्पात आपल्या रुग्णांच्या तपासण्या करून त्यांना रोगमुक्त केले त्या सर्व कुटुंबीयांचे डॉ.अजय गर्जे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


या केंद्र शासनाच्या उपक्रमामध्ये डाॅ.अजय गर्जे यांचा सहभागामुळे शासनाला मदत होत असुन विना मोबदला हे कार्य त्यांनी केले आहे.त्यांची ही कामगिरी सेवाभावी वृत्तीची असुन कोपरगावकरांना त्यांचा सार्थ अभिमान असावा अशीच कामगिरी त्यांची आहे.कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतिने शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी त्यांचे आभार मानत म्हणाले की,वर्षभरात २३५५८ असे विक्रमी बालकांची तपासणी विना मोबदला करणारे डाॅ गर्जे असुन याचा कोपरगावकरांना अभिमान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत