राज्य मार्ग ६५ रांजणगांव देशमुख तालुका हदद ते झगडेफाटा रस्त्यावरील खड्डे बुजवावे-स्नेहलता कोल्हे. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्य मार्ग ६५ रांजणगांव देशमुख तालुका हदद ते झगडेफाटा रस्त्यावरील खड्डे बुजवावे-स्नेहलता कोल्हे.

  कोपरगांव/प्रतिनिधी:-   राज्य मार्ग ६५ रांजणगांव देशमुख तालुका हदद ते झगडेफाटा या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर मोठया प्रमा...

 कोपरगांव/प्रतिनिधी:-


  राज्य मार्ग ६५ रांजणगांव देशमुख तालुका हदद ते झगडेफाटा या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर मोठया प्रमाणांत खडडे पडल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनाचे अतोनात नुकसान होत आहे, प्रवाशी व पादचारी नागरिकांना त्याचा त्रास होत आहे तेव्हा हे खडडे तातडीने बुजवावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी बी भोसले यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. 




            त्या पुढे म्हणाल्या की, राज्यमार्ग ६५ रांजणगांव देशमुख तालुका हदद ते झगडेफाटा हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र त्यास मोठ्या प्रमाणांत खडडे पडल्याने वाहनधारकांचे हात, पाय, कंबरडे मोडले आहेत, अन्य शारीरीक अवयवांना देखील मोठया प्रमाणांत इजा झाली आहे, तर काही निरपराध नागरिकांना प्राणही गमवावे लागले आहे. वाहनधारकांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 




रस्ते वाहतुकीदरम्यान अपघाताचे प्रमाण वाढल्याने रात्री अपरात्री यावरून वाहतुक करणे जिकरीचे झाले आहे. वाहने नादुरुस्त होऊन वाहनधारकांना आर्थीक झळ मोठया प्रमाणांत सोसावी लागत आहे., हे खड्डे बुजविले नाही तर या महामार्गांची आणखी दुरावस्था होईल तेंव्हा हे खडडे तातडीने बुजवावे अन्यथा आपल्याला देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असे त्या शेवटी म्हणाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत