कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील विकासकामे व्हावीत यासाठी एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप बंद करून मे. उच्च न्यायालयाने दिलेली स्थग...
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील विकासकामे व्हावीत यासाठी एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप बंद करून मे. उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी असे जाहीर आवाहन मी केले होते. त्याला कोल्हे गटानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अशी माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.
वहाडणे यांनी पुढे माहिती देतांना संगीतले की,त्याच विषयावर आज नगरपरिषद कार्यालयातील माझ्या दालनात कोल्हे गटाचे नेते पराग संधान व आजी माजी पदाधिकारी यांचेशी अतिशय खेळीमेळीचे वातावरणात साधक बाधक चर्चा होऊन, शंकांचे निरसन करून स्थगिती घेणाऱ्यांनी मे उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून स्थगिती उठवून घ्यावी असे ठरले.
त्यानंतर नगरपरिषदेतील सर्व गटनेते, नगरपरिषद बांधकाम अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या समितीने संबंधित कामे दर्जेदार करून घ्यावीत व काटेकोरपणे मोजमाप घेऊन देयके अदा करावीत असे ठरले. राजकिय आरोप प्रत्यारोप बंद करून शहराची उर्वरीत विकासकामे मार्गी लागावीत हीच जनतेची रास्त अपेक्षा आहे. त्यानुसारच स्थगिती उठविल्यानंतर लवकरच विकास कामे मार्गी लागतील अशी मला आशा आहे असे वहाडणे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत