भूमी फाऊंडेशनने "कन्यदिन"आयोजित करून स्त्रीसन्मान केला -प्रा.डॉ.सीमा चव्हाण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भूमी फाऊंडेशनने "कन्यदिन"आयोजित करून स्त्रीसन्मान केला -प्रा.डॉ.सीमा चव्हाण

शिरसगाव (बाबासाहेब चेडे ):- प्रा.कैलास पवार हे सेवाभावी व्यक्तिमत्व असून त्यांच्या भूमी फाऊंडेशनने "कन्यादिन "साजरा करून खऱ्या अर्...

शिरसगाव (बाबासाहेब चेडे ):-


प्रा.कैलास पवार हे सेवाभावी व्यक्तिमत्व असून त्यांच्या भूमी फाऊंडेशनने "कन्यादिन "साजरा करून खऱ्या अर्थाने स्त्रीसन्मान केला, अशीच स्त्रीसन्मानाची प्रचती वाढली तर स्त्रीसमानता येईल असे मत पुणे जिल्ह्यातील मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.सीमाताई चव्हाण यांनी व्यक्त केले. 


     भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांनी आंतरराष्ट्रीय कन्यादिनानिमित्त ऑनलाईन "नारीशक्ती ही आदिशक्ती "विषयावर प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता, त्याप्रसंगी प्रा.डॉ. सीमाताई चव्हाण प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.



अध्यक्षस्थानी पुणे हडपसर येथील साधना मुलींचे महाविद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरानगर श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष,साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, पुणे वाघोली येथील भारतीय जैन संघटना वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किशोर देसरडा होते.प्रारंभी कल्याणीताई लोहकरे यांनी स्वागतगीत म्हटले.भूमी फौंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष संयोजक प्रा. कैलास पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा.डॉ.सीमाताई चव्हाण यांनी महिला सबलीकरण आणि वेळोवेळी त्यासाठीच्या कल्याणकारी योजनेचा संशोधकीय आढावा घेत सांगितले की स्त्रीशिक्षणाचे प्रमाण अजूनही 65टक्के इतकेच आहे. हजार पुरुषामागे 840एवढेच स्त्री जन्मदर आहे, स्त्री अत्याचार वाढत असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले.

 

  प्रमुख पाहुणे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रा. कैलास पवार यांनी श्रीरामपूर,पुणे,सांगली इत्यादी भागात केलेल्या सेवाभावी कार्याची माहिती देऊन म्हटले की 'कन्यादिन 'साजरा करणे आणि स्त्रीशक्तीला नमन करणे हा स्तुत्य उपक्रम आहे.शिवराय,म.फुले, शाहू महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, पण निर्भयाला अजूनही अभय मिळत नाही, कारण अशा नराधमांना तात्काळ शिक्षा होत नाही.



स्त्री, पुरुष समानता येण्यासाठी संसद,विधानमंडळ आणि क्षेत्रात स्त्री, पुरुष यांना समान प्रतिनिधित्व हवे, नोकरी आणि आरक्षण हे स्त्री पुरुष यांना समोर ठेऊन आरक्षण समान पातळीवर हवे.स्त्रीसमानता सर्वत्र हवी. कुटुंब,व्यवहार आणि समाज यामध्ये स्त्री सक्षम होण्यासाठी खास अभ्यासक्रम असला तर हे शिक्षण उपयुक्त होईल असे सांगून "नारीशक्ती आदिशक्ती "ही कविता सादर केली.कवयित्री सौ. संगीता अशोकराव कटारे, फासाटे यांनी आपल्या मनोगतातून स्त्रीजन्म आणि स्त्रीसन्मान हा विषय एकरूप झाला पाहिजे, अर्थकारण तिच्या हाती असले पाहिजे आणि नोकरीत सुरक्षित वातावरण असेल तर "कन्यादिन "गौरवात्मक होईल असे सांगून प्रा. पवार यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.



हरेगाव येथील आरोग्यमित्र भीमराज बागुल,स्नेहल लोंढे, प्रा. तुकाराम भोईर, बाळासाहेब पाटील, कमल धांडे, कावेरी देवरे, संगीता डावख,पत्रकार, फोटोग्राफर बाबासाहेब चेडे, महेंद्र सिनगार, प्रा. जलाल पटेल, डॉ. राजरत्न वानखेडे, श्रीनाथ आदी उपस्थित होते.भीमराज बागुल यांनी आभार मानले तर प्रा. तुकाराम भोईर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत