भाजप आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा उपक्रम कौतुकास्पद- कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भाजप आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा उपक्रम कौतुकास्पद- कदम

  राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी) गणेश भक्तांनी कल्पक बुद्धीतून साकारलेल्या गणपती सजावटीच कौतुक व्हावं व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी भाजपच्...

 राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी)




गणेश भक्तांनी कल्पक बुद्धीतून साकारलेल्या गणपती सजावटीच कौतुक व्हावं व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी भाजपच्यावतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले.



राहुरी फॅक्टरी शहर भाजप शाखेच्यावतीने घरगूती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना माजी आ.कदम यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्री.विजयकुमार खळेकर होते.


 प्रास्तविकात भाजप शहराध्यक्ष वसंत कदम म्हणाले की, राहुरी फॅक्टरी व परिसरात येत्या काळात भाजपच्यावतीने नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत. गणेशोत्सव काळात राबविलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत नागरिकांनी सहभाग नोंदविल्याबद्दल आभार व्यक्त केले.


यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, गटनेते सचिन ढुस, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र ढुस,व्हाईस चेअरमन सुधीर टिक्कल,सोपान शेटे,  शहाजी कदम, मच्छीन्द्र कदम, दिलीप मुसमाडे, भारत शेटे, सुधाकर कदम, एकनाथ बनकर,फादर फ्रान्सिस विधाटे, रमेश मोरे, आझाद मित्र मंडळाचे संदीप कदम आदी उपस्थित होते.


यावेळी  डॉ.अनंतकुमार शेकोकर यांनी आयुर्वेद क्षेत्रात पीएचडी संपादन केल्याबद्दल तसेच अक्षय छाजेड यांनी सी.ए परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.



 घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील  प्रथम क्रमांक  विजेते डॉ. प्रवीण नामदेव पाखरे, द्वितीय क्रमांक सौ. प्रीती साळुंके, तृतीय क्रमांक कु. पूनम गौतम भागवत, चतुर्थ क्रमांक सचिन उत्तमराव तनपुरे व पाचवा क्रमांक प्रणव प्रकाश पुंड यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले




 सूत्रसंचालन  चेतन कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत