देवळाली प्रवरा(वेबटीम) येत्या काही महिन्यावर देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक होत असून या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार कामाला लागले अ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येत्या काही महिन्यावर देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक होत असून या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार कामाला लागले असून राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर भागातील तरुण नेतृत्व प्रशांत काळे नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छूक असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.
या बैठकीत अंबिकानगर, सोमेश्वर वसाहत व परिसरातील युवकांनी स्थानिक उमेदवार म्हणून प्रशांत काळे यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी करावी असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे सूत्रसंचालन श्री.धनंजय डोंगरे यांनी केले. यावेळी अंबिकानगर, सोमेश्वर वसाहत या भागातील ठराविक मुद्दे तसेच समस्या व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.
प्रसंगी ज्ञानेश्वर मोरे,सुरेशदादा शेजुळ, दत्ता साळुंके , राजू साळुंके आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुसाभाई तांबोळी,किशोर पवार,साई सातपुते,प्रसाद लोखंडे, राहुल हारदे गजानन गाढे, डॉ.प्रवीण पाखरे ,गोविंद खवडे,विठ्ठल बर्डे,मुसा पठाण,सामी तांबोळी,सतिश वाघ,सागर आहेर,संतोष शिरसाठ,योगेश गायकवाड, अजय डुकरे,प्रसाद वाघमारे, शुभम वाघमारे,ज्ञानेश्वर वाघ,विशाल बोर्डे,पांडू शिंदे,निलेश भावर,बाळू थोरे,किरण तुपे,संतोष दाभाडे,योगेश बोरुडे,देविदास डोंगरे,बाळासाहेब खेडकर, सागर बोरुडे,प्रवीण थोरे अंकुश हरिश्चंद्रे संतोष कायगुडे,प्रशांत शेंडे,परवेज पठाण,अशोक पवार,अमोल वरखडे,रोहित काळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत