देवळाली प्रवरा /प्रतिनिधी:- कत्तलीसाठी टेम्पोमध्ये घेऊन चाललेल्या ३ गाया राहुरी फॅक्टरी येथे हिंदू ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प...
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी:-
कत्तलीसाठी टेम्पोमध्ये घेऊन चाललेल्या ३ गाया राहुरी फॅक्टरी येथे हिंदू ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या असता राहुरी पोलीस ठाण्यात शनिवार दि 25 सप्टेंबर रोजी राञी उशिरा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
टाटा एस टेम्पोमधून श्रीरामपूर येथील इद्रिस शरीफ कुरेशी व ममदापुर येथील फईम शेख हे खिलार गोवंश जातीच्या २ तर पांढऱ्या रंगाची १ अशा एकूण तीन गायी कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना राहुरी फॅक्टरी येथे हिंदू ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हा टेम्पो पकडून पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार पोलीस हेडकोन्स्टेबल डी. एन.गर्जे यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन टेम्पो पोलीस ठाण्यात नेला. याप्रकरणी शुभम संजय देवरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत