कोपरगाव/प्रतिनिधी:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पोहेगाव परिसरातील अवैध व्यवसाय व बेकायदा दारु विक्री कायमस्वरूपी बंद करण्या...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पोहेगाव परिसरातील अवैध व्यवसाय व बेकायदा दारु विक्री कायमस्वरूपी बंद करण्याबाबत जुलै महिन्यातच पत्राद्वारे कळविले होते. तसेच पोलीस दूरक्षेत्र नियमितपणे सुरू करण्याची देखील मागणी केलेली होती. शिवाय आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतु, अद्यापही दखल घेतली नाही. आता पुन्हा नव्याने शिर्डी पोलिसांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सोमवार दि.27 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत पोहेगाव ग्रामपंचायतने शिर्डी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, पोहेगाव परिसरात अवैध धंद्यांचा आणि दारु विक्रीचा सुळसुळाट झालेला आहे. याबाबत ग्रामपंचायतमध्ये 26 जुलैला ठराव करुन पोहेगाव पोलीस दूरक्षेत्रास लेखी पत्र देण्यात आले होते. यास साधारण एक ते दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला असून, अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पोलीस दूरक्षेत्र बंद असून, अवैध धंदे आणि दारु विक्री जोमात सुरू आहे. यावर 26 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कार्यवाही केली गेली नाही तर सोमवार दि.27 सप्टेंबरपासून पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने सरंपच यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत