नगराध्यक्ष वहाडणेंची भूमिका कौतुकास्पद – विरेन बोरावके - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगराध्यक्ष वहाडणेंची भूमिका कौतुकास्पद – विरेन बोरावके

कोपरगाव(वेबटीम):- विकासकामे थांबता कामा नये अशी आमदार आशुतोष काळे यांची विचारधारणा आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव नगरपरिषदेला ...

कोपरगाव(वेबटीम):-

विकासकामे थांबता कामा नये अशी आमदार आशुतोष काळे यांची विचारधारणा आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव नगरपरिषदेला मिळालेल्या निधीतून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दुसऱ्या मजल्याच्या कामाचे भूमीपूजन करून घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.


कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे त्याप्रमाणेच कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील त्यांनी जवळपास १२ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीसाठी देखील नगरविकास मंत्रालयाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी रुपये निधी आणला आहे. त्यानंतर आलेल्या ५ कोटीच्या निधीतून प्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुधारणा करणे १ कोटी, प्रशासकीय इमारत कंपाऊंड करणे ५० लक्ष निधी देण्यात आला आहे.

कोपरगाव शहाराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून उपलब्ध निधीतून लवकरात लवकर विकासकामे होवून नागरिकांना त्यांचा उपयोग झाला पाहिजे. कोणत्याही कारणास्तव विकासकामे खोळंबून राहता कामा नये अशी त्यांची तळमळ आहे. 


आ.काळेंची हीच तळमळ ओळखून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या विकासकामांना तातडीने प्रारंभ करून नगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्याच्या केलेल्या कामाचे भूमीपूजन करून कामास प्रारंभ केला हे खरोखर कौतुकास्पद असल्याचे विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत