कोपरगावमध्ये नगरपालिका कर्मचार्‍यांच्या हस्ते पालिका इमारतीच्या वरील मजल्याचे भूमिपूजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावमध्ये नगरपालिका कर्मचार्‍यांच्या हस्ते पालिका इमारतीच्या वरील मजल्याचे भूमिपूजन

कोपरगाव/प्रतिनिधी कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारतीच्या वरील मजल्यांचे भूमिपूजन नगरपालिका कर्मचार्‍यांच्या हस्ते सोमवारी (ता.20) ...

कोपरगाव/प्रतिनिधी



कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारतीच्या वरील मजल्यांचे भूमिपूजन नगरपालिका कर्मचार्‍यांच्या हस्ते सोमवारी (ता.20) करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली.





मंगळवारपासून पितृपक्ष सुरू होत असल्याने व कामाला उशीर होऊ नये म्हणून आजच भूमिपूजन करण्यात आले. गेली 5 वर्षे अनेकदा सर्वसामान्य व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार सोमवारी देखील गेली अनेक वर्षे कोपरगाव शहर, तालुका व परिसरातील अपघात-आत्महत्या, बेवारस मृतदेहांची प्रामाणिकपणे वाहतूक करणारे रुग्णवाहिका चालक अमित खोकले व नगरपरिषदेचे स्वच्छता दूत, मेहनती सफाई कामगार राजू मेवाते यांच्या हस्ते हे भूमिपूजन केले.




 या कामासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नांतून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक योजनेतून 4 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. तळमजला व पहिल्या मजल्याचे काम माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नांतून मिळालेल्या 2 कोटी रुपये निधीतून पूर्ण झालेले आहे. त्या इमारतीचे उद्घाटन सर्व नेत्यांना बोलावून लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे, असेही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत