कोपरगाव/वेबटीम:- चि. प्रसाद दिलीप सुतार (पिंपळे निळख) पुणे यांची ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटी लंडन येथे एम एस इन रोबोटिक्स उच्च शिक्षणासाठी ...
कोपरगाव/वेबटीम:-
चि. प्रसाद दिलीप सुतार (पिंपळे निळख) पुणे यांची ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटी लंडन येथे एम एस इन रोबोटिक्स उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबददल सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करून त्यास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी कोल्हे कारखान्यांचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, प्रसाद याचे वडील दिलीप सुतार आदि उपस्थित होते.श्री. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, युवकांनी जास्तीत जास्त प्रगत शिक्षण घेवुन त्या क्षेत्रात अत्युच्च नाव कमविले पाहिजे व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर त्या त्या क्षेत्रात कसा होईल हे पाहिले पाहिजे. जग आधुनिक तंत्रज्ञानामुळे जवळ आले असुन ते तंत्रज्ञान काय आहे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी केलेला सत्कार व मार्गदर्शन चि. प्रसाद याच्या उच्च शिक्षणासाठी व भावी करिअरसाठी सार्थकी ठरेल अशी ग्वाही कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी याप्रसंगी बोलतांना दिली. श्री. सुतार कुटूंबिय हे सांगली जिल्हयातील तासगांव येथील मणेराजुरी येथील असुन त्यांचे आजोबा गुंडा तातोबा सुतार हे मणेराजुरी येथे वास्तव्यास असुन ते मुख्याध्यापक होते. श्री. गुंडा सुतार यांची सर्व मुले उच्चशिक्षीत असुन बाजीराव सुतार हे गेल्या ३५ वर्षापासुन सहकारी सखर कारखानदारीत काम पहात असून ते सध्या सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांत कार्यकारी संचालक म्हणून काम पहात आहेत. प्रसाद सुतार याचे वडील दिलीप सुतार हे मायक्रोमॅक्स कंपनीत रिजनल हेड म्हणून काम पहात आहेत. केवळ शिक्षणाच्या जोरावर व योग्य मार्गदर्शनाने सर्वसामान्य व्यक्ती साता समुद्रापार उच्च शिक्षणासाठी जाउ शकतो हे सुतार कुटूंबियांनी दाखवून दिले आहे. मणेराजुरीसारख्या खेडयातुन लंडनला जाणारी ही पहिलीच व्यक्ती आहे. श्री बाजीराव सुतार व श्री. दिलीप सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली चि. प्रसाद यांनी यशाचा एव्हढा मोठा टप्पा गाठला आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चि. प्रसाद सुतार हे ब्रिस्टॉल युनिव्हरसिटीकडे उच्च शिक्षणासाठी रवाना झाले.
चि. प्रसाद सुतार यांचे प्राथमिक शिक्षण भारतीय विद्यापीठ पुणे, शालेय शिक्षण न्यू मॉर्डन इंग्लिश स्कुल कोल्हापुर, उच्च शिक्षण पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे रावेत येथील कॉलेज मध्ये झाले तसेच बी. ई. मेकनिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची नोकरीसाठी निवड इन्फोसेस म्हैसुर, पुणे मध्ये झाली होती. तदनंतर उच्च शिक्षणासाठी ब्रिस्टॉल युनिव्हरसिटी लंडन येथे निवड झाली असुन लंडनचे हिथ्रो विमानतळावर चि. प्रसाद सुतार नुकतेच दाखल झाले आहेत. त्याचे शैक्षणिक प्रवासासाठी आई सौ सुजाता सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. चि. प्रसाद सुतार यांचे निवडीबददल त्यांचे नातेवाईक, हितचिंतकासह सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत