कोपरगाव/प्रतिनिधी:- भारतातील पहिले अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. ...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
भारतातील पहिले अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयातही हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी नगर नियोजन अभियंता दीपक बडगुजर, संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे, स्थापत्य अभियंता नीतेश मिरीकर, यांत्रिक अभियंता ज्ञानेश्वर चाकणे, मोटार अभियंता योगेश खैरे, इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियंता पल्लवी सूर्यवंशी, विद्युत अभियंता रोहित सोनवणे, मोटार अभियंता ऋतुजा पाटील, स्थापत्य अभियंता हर्षवर्धन सुराळकर, संगणक अभियंता गणेश आहिरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रत्येक अभियंत्यांनी आपले शिक्षण, आपल्या कार्याचा अनुभव तसेच भविष्यकालीन नियोजन याबाबत परिचय करून दिला. यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अभियंत्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. चंद्रकांत साठे, रवींद्र वाल्हेकर, सुनील आरणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महारुद्र गालट यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र गाढे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत