कोपरगाव/वेबटीम:- रस्त्याची वाट लागली..... दोन तीन दिवसांपूर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर पावसाने मोठा खड्डा पडला ..वर्दळीचा रस्ता असल्याने ...
कोपरगाव/वेबटीम:-
रस्त्याची वाट लागली..... दोन तीन दिवसांपूर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर पावसाने मोठा खड्डा पडला ..वर्दळीचा रस्ता असल्याने छोटे मोठे अपघात होत होते ...पोलीस शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी या ठिकाणी एक होमगार्ड नेमले अपघाती जागेवर बॅरिकेटर लावले...
काल सकाळी काही कामानिमित्ताने मी तहसील कार्यालयातुन बाहेर येत असताना साहेब जवळून चालले थोडा वेळ माझ्याशी बोलत असताना
देसले साहेब यांच्या नजरेस हा खड्डा पुन्हा आला आम्ही बोलत असताना लगेच मा पोलीस निरीक्षक देसले साहेबांनी कोपरगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेबांना फोन लावला खड्डा बुजवण्याची मुरूम टाकण्याची मागणी केली
आणि एक ते दिड तासात या रस्त्यावर मुरूम येऊन रस्ता तात्काळ बुजवला खरंच एक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी नुसतेच कायदा व सुव्यवस्थेवरच लक्ष ठेवत नाही तर अनुचित घटना घडू नये म्हणून काळजी घेतात .
धन्यवाद मा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब व मुख्याधिकारी मा शांताराम गोसावी साहेब यांचे अँड.नितीन पोळ यांनी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत