कोपरगाव/वेबटीम:- आज रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी अनंत चतुर्थी दिनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्य...
कोपरगाव/वेबटीम:-
आज रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी अनंत चतुर्थी दिनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन यांनी सुसज्ज नियोजन करून गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन केले. शहरातील नागरिकांचे विसर्जन करणेसाठी गैरसोय होऊ नये याकरिता शहरातील विविध भागातील मुख्य सात ठिकाणी श्री गणेश मूर्ती विसर्जन रथ उभारणी करण्यात आले होते. सर्व रथ नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी शहर हे आपले एक मंडळ आहे अशा पद्धतीने सजविले होते. कोरोनाविषयक कोणतेही नियम न मोडता नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना कोणतीच गैरसोय होऊ नये याकरिता दिवसभर मुर्त्यांचे संकलन केले. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गर्शनाखाली याप्रत्येक टीम सोबत दोन पोलिस अधिकारी कर्मचारी पोलिस प्रशासाने दिले होते.
संध्याकाळी ६ वाजता सर्व गणेशमूर्तींचे गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली सर्व प्रशासनाने हजर राहून भक्तिभावाने विसर्जन केले. हे सर्व नियोजन पाहून शहरातील नागरिक भावूक झालेले दिसले. शहरातील नागरिकांनी या ठिकठिकाणी असणाऱ्या पथकाचे कौतुक करून सत्कार करण्यात आले.
नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. स्वतः नगराध्यक्षांनी शहरातील सर्व गणेश विसर्जन ठिकाणांची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुनियोजित काम करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले व केलेले काम शहर कधीच विसरणार नाही, अशा शब्दात कौतुक केले.
पर्यावरणाची हानी होऊ नये या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाने गोदावरी नदीमध्ये मूर्ती विसर्जन करणे तसेच नदीमध्ये निर्माल्य टाकणे ही प्रथा कमी करून गोदावरी नदीचे संवर्धन केले अशी प्रतिक्रिया आदिनाथ ढाकणे यांनी दिली.
या कामी सर्व ठेकेदार यांनी तात्काळ आपले ट्रॅक्टर्स जेसीबी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले या सर्वांचे सहकारी अमूल्य आहे.
या कार्यास गोदामाई प्रतिष्ठान, के जे सोमय्या महाविद्यालय, लायन्स क्लब यांनी देखील सहकार्य केले.
शहरातील सर्व गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर "एक गाव एक गणपती" श्री गणेशाचे विसर्जन थाटामाटात उत्साहाच्या वातावरणात नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन सर्व नागरिक, सर्व पदाधिकारी यांच्यावतीने करण्याचे नियोजन आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत