आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील दवणगाव सह सात गाव पाणी पुरवठा योजनेच्या पदाधिकारी निवडीत मोठी चुरस निर्माण झाली होती. या जोजनेच्या लाभधारक ग...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील दवणगाव सह सात गाव पाणी पुरवठा योजनेच्या पदाधिकारी निवडीत मोठी चुरस निर्माण झाली होती. या जोजनेच्या लाभधारक गावांमध्ये दोन गट तयार झाले होते. नुकत्याच पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पिंपळगाव फूणगी येथिल शिवाजीराव जाधव यांची अध्यक्षपदी तर आंबीचे उपसरपंच विजय डुकरे यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड झाली.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार आंबी व अंमळनेर ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने मारुती मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जेष्ठ नेते वसंतराव कोळसे यांच्या अध्यक्षतेखाली, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव कोळसे, आंबी सोसायटीचे माजी चेअरमन रावसाहेब सालबंदे, देखरेख संघाचे माजी अध्यक्ष भागवत कोळसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठलपंत कोळसे, माजी उपसरपंच पंकज कोळसे, आंबीचे सरपंच बाळासाहेब साळुंके, अंमळनेरचे सरपंच भारत जाधव, उपसरपंच किरण तात्या कोळसे, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे, ऍड. विठ्ठल कोबरणे, दत्तात्रय हुरुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी आंबी सजेमध्ये नव्याने रुजू झालेले कृषी सहायक राहुल निर्मळ, केसापूरचे गोरक्षनाथ पवार, धनंजय टाकसाळ, विलास बनसोडे, सरपंच भारत जाधव, रमेश कोळसे, दादा साळुंके, सरपंच बाळासाहेब साळुंके, हरिश्चंद्र साळुंके, पिंपळगाव फुणगीचे साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन संभाजी नांनोर, रंगनाथ नांनोर, उस्मान शेख, दत्तात्रय पारखे, जगन्नाथ वर्पे, नारायण जाधव, दवणगावचे संदिप जऱ्हाड आदी पाहुण्यांचा आंबी व अंमळनेर ग्रामपंचायतींच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे शाखाध्यक्ष विठ्ठल एस. कोळसे, भिम कोळसे ग्रामपंचायत शिपाई श्रीहरी साळुंके, प्रशांत चव्हाण यांनी मेहनत घेतली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत