राहुरी प्रतिनिधी-: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे पाच ठिकाणी गावठी दारु अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथका...
राहुरी प्रतिनिधी-:
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे पाच ठिकाणी गावठी दारु अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बुधवार 8 सप्टेंबर रोजी छापा टाकून 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.हि कारवाई करताना राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना थांगपत्ता हि नव्हता.इंगळे अजुनही सत्कारातच मग्न आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने. मिटके यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्यासह देवळाली प्रवरा येथे परिसरातील ५ गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू जागेवरच नष्ट केली आहे. या कारवाईत 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुरीचे पोलीस निरीक्षक इंगळे व देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील पोलीसांना पोलीस उपअधिक्षक मिटके यांनी एक प्रकारे चपराक दिली आहे.
राहुरी पोलीस ठाण्यात नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक इंगळे राजकीय वजन वापरुन आले असल्याने राजकीय नेत्याच्या मर्जी नुसारच पोलीस ठाण्याचा कारभार करावा लागणार आहे.पोलीस उपअधिक्षक मिटके यांच्या पथकाने इंगळे यांना पुर्ण अंधारात ठेवून हि कारवाई केली आहे.इंगळे आज हि हारतुरे घेण्यात मग्न आहेत.राजकीय नेत्या पासुन ते गुन्हेगारां पर्यंत इंगळे यांचा सत्कार करण्यास रांग लागली होती.पोलीस उपअधिक्षक मिटके यांनी काही ठराविक पोलीसांच्या स्वतःच्या आदेशाने बदल्या केल्या होत्या.परंतू इंगळे यांनी त्या पोलीसांना पुर्वीच्या जागेवर पुन्हा पाठविल्याने मिटके इंगळे वाद उफळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, हेडकोन्स्टेबल सुरेश औटी, पोलीस नाईक पंकज गोसावी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, राहुल नरवडे, सुनील दिघे, गौतम लगड, पूजा पवार, अनिता गीते आदींनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत