कोपरगाव/प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील आरोग्य सेवा परीक्षेत वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ३५ वा क्रमांक मिळवला व कोपरगाव तालुक्यातील पहिली मुस्लि...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
महाराष्ट्रातील आरोग्य सेवा परीक्षेत वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ३५ वा क्रमांक मिळवला व कोपरगाव तालुक्यातील पहिली मुस्लिम समाजातील एम. बी. बी. एस. कन्या म्हणून नावलौकिक मिळवला. या उत्तुंग यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून तिचे डॉ.असिफा पठाण हिचे कौतुक होत आहे.
याप्रसंगी भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निसार शेख, ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना यासिन साहेब, निसार साहेब, शफिक साहेब, अय्युब शेख, ऍड. हमीद शेख, इम्रान सय्यद, सोहेल शेख, ऍड.समीर शेख, मुफ्ती मसूद साहेब, मौलाना शाहिद, माजिद पठाण, असिफ पठाण आदी समाज बांधव उपस्थित होते. डॉ.असिफा हिच्याबरोबर तिला यशाचा मार्ग दाखविणारे आणि परिश्रम घेणाऱ्या आई वडिलांचा देखील सन्मान करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत