कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे यांची जामखेड येथे बदली झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगाव येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे यांची जामखेड येथे बदली झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही बदली झाली आहे.
आपल्या कामाच्या अनोख्या पद्धतीमुळे जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेले कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांची १७ सप्टेंबर रोजी बदली झाली आहे. जामखेड तहसील कार्यालयात त्यांची बदली झाली आहे. १७ सप्टेंबर रोजी त्यांचा तहसीलदार योगेश चंद्रे यांचा वाढदिवस असल्याने कोपरगावकरांनी सन्मान व शुभेच्छा देत साजरा केला.आणि त्याच दिवशी त्यांची रात्री त्यांच्या बदलीचा आदेश आला आहे.
कोरोना काळात त्यांनी कोपरगाव तालुक्यात जीव ओतून काम करून २४ तास जनतेच्या सेवेत राहून प्रामाणिकपणे सेवा केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत