अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य निभवावे : न्या.बोधनकर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य निभवावे : न्या.बोधनकर

कोपरगाव/प्रतिनिधी:- पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व सदसद्विवेकबुद्धीने केल्यास आपल्या हातून कोणतीही चूक घडणार...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व सदसद्विवेकबुद्धीने केल्यास आपल्या हातून कोणतीही चूक घडणार नाही. उलट लोकसेवा केल्याचा आनंद मिळेल असे प्रतिपादन कोपरगाव न्यायालयाचे न्यायाधीश बोधनकर यांनी केले.


कोपरगाव नगरपालिका, तालुका विधी समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेत शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी ५.३० वाजता कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी न्यायाधीश कोऱ्हाळे, कनिष्ठ स्तर न्यायाधीश डोईफोडे, शेख, सरकारी वकील वहाडणे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित न्यायाधीश यांनी कायदा समजून घेणे किती महत्वाचे आहे हे सांगितले. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी लोकसेवक या नात्याने जबाबदारी निभावल्यास आपोआप कायद्याचे पालन होईल. कार्यालयात विशाखा समितीने देखील जबाबदारी पार पाडावी. आपल्या गरजा भागवण्यासाठी अनेकजण मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात; त्या कर्जाच्या परतफेडीच्या बदल्यात भरमसाठ व्याज देऊन कुटुंबावर उपासमारीची वेळ आणतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गरजा नियंत्रणात ठेवाव्या असे आवाहन केले. विधी सेवा समिती मार्फत मोफत कायदेविषयक ज्ञान व सल्ला देण्यात येतो त्याचा फायदा घ्या असेही आवाहन केले. न्यायाधीश डोईफोडे यांनी न्यायव्यवस्था सर्वांसाठी एकसारखीच असल्याची  चित्रफीत दाखवली.


स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन महारुद्र गालट यांनी केले तर आभार हर्षवर्धन सुराळकर यांनी मानले. या शिबिरास नगरपरिषद कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत