कोपरगाव/प्रतिनिधी:- नॅशनल लिगल सर्व्हिस ॲथॉरिटीच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात सर्वसामान्य जनतेला कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येते. त्या...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष राम थोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सरकारी वकील अशोक टुपके यांनी कायद्यातील अगदी छोट्या गोष्टी कशा असतात आणि त्यांचे नकळत उल्लंघन कसे होते याविषयी माहिती दिली. विशेष म्हणजे तसे होऊ नये असे आवाहन केले. कोपरगाव न्यायालयाच्या वरीष्ठ न्यायाधीश एस. एन. सचदेव यांनी समाजातील छोटे-छोटे मतभेद आणि वाद लोकन्यायालय येथे घेऊन ते स्वयंस्फूर्तीने व एकमेकांच्या सहकार्याने मिटवा आणि समाजात शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन केले. तसेच वरीष्ठ न्यायाधीश डोईफोडे यांनी आजचे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक आहेत म्हणून त्यांच्यामार्फत एक आदर्श समाज आम्हांला घडवायचा आहे त्यासाठी सर्व शिक्षकांची भूमिका महत्वाची असणार आहे असे सांगितले.
यावेळी तालुका विधी सेवा प्राधिकरणचे मनोज कडू व स्थानिक स्कूल कमिटीचे प्रसिद्ध उद्योजक राजेश ठोळे, मुख्याध्यापक निमूनकर, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे सचिव अक्षय गिरमे, खजिनदार सुमित भट्टड, सुरेश शिंदे, राजेश जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसाद भास्कर यांनी केले तर आभार श्री.भागवत यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत