कोपरगाव/प्रतिनिधी:- कोविडच्या भयावह संकटात कोपरगाव शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात दुचाकीवर आलेल...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात शिक्षिका संगीता गणेश देशमुख (वय 54) या दुचाकी उभी करत असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे साठ हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण धूमस्टाईलने लांबवून पोबारा केला.
याबाबत शिक्षिका संगीता देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुरनं.293/2021 भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहे.
दरम्यान, कोविड संकटाने नागरिक आधीच भयभीत असताना चोऱ्या सुरू झाल्याने अधिक भर पडली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर चोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान ठाकले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत