वहाडणे यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आम्ही आमची बाजू मांडली, सर्वसहमतीने निर्णय व्हावा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वहाडणे यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आम्ही आमची बाजू मांडली, सर्वसहमतीने निर्णय व्हावा

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव नगरपालिकेत काळे गटाने शहरवासियांना २८ कामांस कोल्हे गटाच्या भाजपा-शिवसेना नगरसेवकांचा विरोधाचा बागुलबुवा दाखवून व ज...

कोपरगाव/वेबटीम:-

कोपरगाव नगरपालिकेत काळे गटाने शहरवासियांना २८ कामांस कोल्हे गटाच्या भाजपा-शिवसेना नगरसेवकांचा विरोधाचा बागुलबुवा दाखवून व जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करून याबाबत राजकारण सुरू ठेवले आहे, मात्र ही बाब नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शहर विकासासाठी सर्व पक्षांनी साथ द्यावी असे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही आमची बाजू त्यांच्यापुढे मांडली असून सर्वसहमतीने त्यावर निर्णय व्हावा असे प्रतिपादन भाजपचे पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.


  कोपरगाव भाजपा कार्यालयात बुधवारी भाजपा शिवसेना नगरसेवकांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन त्या २८ कामांची नेमकी वस्तुस्थिती काय आहे याबाबत भूमिका मांडली, यातील 22 कामांना आमचा कुठलाही विरोध नाही मात्र उर्वरित ६ कामांमध्ये जनतेच्या पैशाची मोठयाप्रमाणात उधळपट्टी  असून त्यातील अवास्तव अंदाजपत्रकीय रक्कम रद्द करून, वाचलेल्या पैशामध्ये शहरातील एस.जी विद्यालय रोड, येवला रोड, गुरुद्वारा रोड, आंबेडकर स्मारक ते संभाजी पुतळा रोड व संभाजी पुतळा ते निवारा कॉर्नर रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, असे प्रतिपादन संयुक्तरित् करण्यात आले.




             याप्रसंगी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, विनोद राक्षे अतुल काले, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, नगरसेवक शिवाजी खांडेकर, वैभव गिरमे, पप्पू पडियार, रवी रोहमारे, दिपक जपे,  आदी उपस्थित होते. 

             सवंग लोकप्रियतेच्या नावाखाली गांधीनगर भागातील खड्ड्यात काळे गटाने माती मिश्रित मुरूम टाकला त्याचा निषेध माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी नोंदवत, या २२ कामातील नेमकी पार्श्वभूमी काय व ६ कामांबाबत  कसा विरोध आहे, व त्यात कशा पद्धतीने कामे करायची याची सर्व  पार्श्वभूमी  मांडली.

               श्री.  संजय सातभाई, पराग संधान, शिवसेनेचे योगेश बागुल, व माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे संयुक्तरीत्या बोलताना म्हणाले की, पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ कोल्हे गटाला बदनाम करण्यासाठी झारीतले शुक्राचार्य काम करत आहेत.   काळे गटाने विधानसभा निवडणुकीत पाचव्या साठवण तळ्याचे राजकारण करून शहरवासीयांना खोटा विकास दाखवत सत्ता मिळवली.  निळवंडे शिर्डी कोपरगाव पिण्याच्या पाईप लाईन कामात पद्धतशीरपणे खोडा घालून शहरवासीयांना हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून व त्यातून होऊ घातलेल्या विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप केले.  त्या २८ कामातील २२ कामांना आमचा कुठलाही विरोध नव्हता, उर्वरित ६ कामांमध्ये अवास्तव खर्च वाढवून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा विरोधकांचा पद्धतशीरपणे प्लॅन होता.  त्याला अटकाव आणून त्यावर सर्वसंमतीने पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा बोलावून एक मताने निर्णय व्हावा म्हणून फेब्रुवारीपासून आम्ही मागणी करत होतो, परंतु आमची ही मागणी बाजूला ठेवून केवळ आणि केवळ कोल्हे गट विकास कामे होऊ देत नाही हे चित्र शहरवासीयावर बिंबविण्याचे कट-कारस्थान काळे गटाच्या नगरसेवकांनी सुरू ठेवले,  ही बाब नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मंगळवारी याबाबत ठोस भूमिका घेत बाजू मांडली व शहर विकासाला सर्व पक्षांनी साथ देण्याची भूमिका आमच्या समोर घेतली त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.  ६  कामातील अवास्तव खर्च आम्ही नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या निदर्शनास आणून देऊन आमची काय काय मते आहेत ही भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आहे याबाबत सर्वसंमतीने पालिका सभागृहात निर्णय व्हावा व कोपरगाव शहरवासीयांना अपेक्षित रस्त्यांच्या कामासह उर्वरित  विकास कामे तात्काळ व्हावीत असे शेवटी पराग संधान, संजय सातभाई योगेश बागुल, राजेंद्र सोनवणे म्हणाले.



 पाया पडतो.

कोपरगाव शहरवासीयांना शुद्ध नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर करून आणलेल्या प्रस्तावित निळवंडे शिर्डी कोपरगाव पिण्याच्या पाणीपुरवठा योजना कामास अडवणूक करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांच्या पाया पडतो पण हे काम होऊ द्यावे अशी कळकळीची विनंती माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत