देवळाली प्रवरा(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे बुधवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी दिवसभरात एकूण तब्बल २२ रुग्ण आढळून आले असल्या...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे बुधवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी दिवसभरात एकूण तब्बल २२ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यात आज दिवसभरात ६१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यामध्ये देवळाली २२ रुग्णांचा समावेश आहे.
देवळाली प्रवरात गेल्या आठवड्यात ४० ते ५० कोरोना रुग्ण आढळून आले. आज एकाच दिवशी २२ रुग्ण आढळुन आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
सोशल डिस्टनसिग, मास्क सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत