प्रवरा पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बनवली प्लास्टिक ड्रम व पीव्हीसी पाईपपासून गणेशमूर्ती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रवरा पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बनवली प्लास्टिक ड्रम व पीव्हीसी पाईपपासून गणेशमूर्ती

  लोणी(वेबटीम):- येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या "टाकाऊ पासून टिकाऊ...

 लोणी(वेबटीम):-


येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या "टाकाऊ पासून टिकाऊ " या आगळ्यावेगळ्या गणेश उत्सव संकल्पनेतून प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक श्री पटेल सर व विद्यार्थ्यांनी 'प्लास्टिक ड्रम व पी वी सी पाइप' पासून ५.५ फूट उंचीची गणेश मूर्ती बनवली. 



तसेच कोणताही खर्च न करता विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू पासून शोभिवंत वस्तू बनवून सजावट केली. प्राणप्रतिष्ठेपूर्वी मोठ्या थाटामाटात बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थीनिंच्या शुभहस्ते गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली व शाळेचे कोआॅर्डीनेटर श्री एम. जी. निमसे व त्यांच्या सौभाग्यवतींच्या शुभहस्ते आरती झाली. 


सदर प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक श्री जोसेफ सर, उमक सर, बोधक सर, पटेल सर, सय्यद मॅडम, भावसार मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.या उपक्रमास प्राचार्या डॉ रोजमीन बेलिम यांनी  मार्गदर्शन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत