कोपरगाव/प्रतिनिधी:- कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षानुसार कोपरगाव शहरात 'एक गाव, एक गणपती' साजरा करण्याचा निर्णय शांतता समितीच्य...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षानुसार कोपरगाव शहरात 'एक गाव, एक गणपती' साजरा करण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत बहुमताने घेण्यात आला होता. त्यानुसार आज (शुक्रवारी ता.१०) श्री गणेशाची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली. शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सपत्नीक विधीवत पूजा-अर्चा करून श्री गणेशाला नमन करून कोरोना संकट दूर करण्याची प्रार्थना केली.
कोरोना विषाणूंनी सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून सण-उत्सवांवर निर्बंध आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षानुसार कोपरगाव प्रशासनाने गणपती मंडळांना गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीत 'एक गाव, एक गणपती' साजरा करण्याचा बहुमताने निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज श्री गणेशाची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली.याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगरसेवक स्वप्नील निखाडे यांसह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सलग दुसऱ्या वर्षी 'एक गाव, एक गणपती' साजरा होत असल्याने कोपरगावकरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत