राहुरी फॅक्टरी(ऋषि राऊत):- राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट संचलित आयुर्वेद महाविद्यालयात शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी सायंकाळ...
राहुरी फॅक्टरी(ऋषि राऊत):-
राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट संचलित आयुर्वेद महाविद्यालयात शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते गणपतीची बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालयात दरवर्षी विद्यार्थ्यांच्यवतीने गणेशोत्सव साजरा केला. यंदाही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आयुर्वेद महाविद्यालयात विद्यालयातील विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती.
आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता खा. डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते श्रींचे विधिवत पूजन व आरती संपन्न झाली.
यावेळी संचालक महेश पाटील, प्रा.डॉ.विलास कड, डॉ.पागिरे सर तसेच प्राध्यापक वृंद विद्यार्थी योगेश पगारे, विद्यार्थी प्रतिनिधी कृष्णा चाळगे, कार्तिक पांडेकर, निखिल वरघणे, स्वराज तुपे, संकेत भोसले, शुभम लांडगे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी खा.विखे यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून समाजपयोगी उपक्रम राबवावे असे आवाहन खा.विखे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत