कोपरगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन - नगराध्यक्ष वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन - नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव/वेबटीम:-   मंगळवार दि १४ सप्टेंबर २०२१ रोजी व्हेंचर्स एज्युकेअर लिमिटेड आणि स्टाफ ब्लूम यांच्या कौशल्य विकास प्रकल्प अंतर्गत कोपरगाव...

कोपरगाव/वेबटीम:-  


मंगळवार दि १४ सप्टेंबर २०२१ रोजी व्हेंचर्स एज्युकेअर लिमिटेड आणि स्टाफ ब्लूम यांच्या कौशल्य विकास प्रकल्प अंतर्गत कोपरगाव येथे सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींसाठी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी दिली आहे.






सविस्तर वृत्त असे की नगराध्यक्ष विजय वाहडणे व एम.के आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव यांच्या संकल्पनेतून इयत्ता ८ वी व  इयत्ता १० वी या वर्गात मल्टीस्किल व ऑटोमोबाईल हे विषय घेऊन पुढे आय.टी.आय, डिप्लोमा, पदवीधर  तसेच इतर पात्र मुला-मुलींसाठी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन ठीक दुपारी तीन वाजता एम.के. आढाव विद्यालयात प्रथमच विनाशुल्क आयोजन केले आहे.




तरी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांसह विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी या नोकरी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत