मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न

  कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथे साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा शाखा क्रं ३ ,  श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगांव यांच्या वतीने  मोफत सर्...

 कोपरगाव प्रतिनिधी:-

कोपरगाव येथे साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा शाखा क्रं ३ ,  श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगांव यांच्या वतीने  मोफत सर्व रोग निदान शिबीर आज   रविवार दिनांक १२/९/२०२१ संपन्न झाले  आहे. .या शिबिराचे उदघाटन डाॅ कृष्णा फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आले.


या शिबिरासाठी  डॉ. कृष्णा फुलसौंदर आरोग्य अधिकारी ग्रामिण रुग्णालय,वासुदेव देसले पोलिस निरीक्षक कोपरगाव पोलिस स्टेशन कोपरगांव, डॉ. जिया शेख BAMS आयुर्वेद,राजेंद्र सालकर अध्यक्ष प्रेस क्लब कोपरगांव, बाळासाहेब आव्हाड अध्यक्ष दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर ,दिनार पद्मकांत कुदळे उद्योजक,भरत मोरे शहराध्यक्ष एस.टी. कामगार सेना ,अस्लम शेख विधानसभा संघटक,डॉ. नरेंद्र भट्टड श्री.जी कम्युटरराईज ब्लड लॅब, इरफान शेख जिल्हाप्रमुख शिवसेना वाहतुक, उपस्थित होते.


यावेळी पोलिस निरिक्षक वासुदेव देसले म्हणाले की,आरोग्य शिबिरे सामान्य व्यक्तीसाठी महत्वाची अाहेत.वेळेवर आजाराचे निदान झाल्यास गरिबांना याचा निश्चित फायदा होईल.नागरिक लोकसेवेसाठी एकत्र येतात हि अभिमानाची गोष्ट आहे.रक्तदान शिबिरालाही महत्व द्यावे असे ते म्हणाले आहे.प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार राजेद्र सालकर यांनी या शिबिराच्या आयोजकांना शुभेच्छा देत अशा शिबिरामुळे गोरगरीब नागरिकांना लाभ होत आहे.मोठ्या आजाराचे निदान अशा शिबिरातून होत असते.त्यामुळे गरिबासाठी शिबिरे आयोजित केल्यामुळे फायदा होत आहे.डाॅ.कृष्णा फुलसौदर म्हणाले की,साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा, श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगांव यांच्या वतीने  मोफत सर्व रोग निदान शिबिराला शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. 

डाँ.प्रसाद कातकडे, डाॅ.अमित नाइकवाडे अस्थिरोग तज्ञ ,डाॅ.शंशाक तुसे MBBS MD ,डाॅ.निरज काळे MBBS. Ms हदय शस्त्रक्रीया तज्ञ, डाँ.दिपक राजगुरु,. डाॅ.सौ.तेजश्री चव्हाण (नाईकवाडे),नेत्ररोग तज्ञ,डाॅ.विशाल काळे अस्थिरोग तज्ञ,डाॅ.पूजा कातकडे,डाॅ.तुषार सांळुके,डाॅ.प्रशांत सगळगीळे,डाॅ मयूर गंगवाल डाँ.पठाण मॅडम व्यवस्थापक सचिन जानेवकर,जनसंपर्क अधिकारी महेश रक्ताटे,श्री उत्तम भागवत,सोशल वर्कर विलास कदम अशा तज्ञ डाँक्टरांच्या उपस्थित तपासणी आरोग्य शिबिर संपन्न झाले आहे.

या शिबिरात २०० पेक्षा आधिक नागरिकांनी सहभाग नोदविला आहे.या शिबिरामध्ये ९० ते १०० नागरिकांची डायबिटीज तपासणी तसेच ५० ते ६० नागरिकांची ECG तपासणी मोफत करण्यात आली.डोळे तपासणी हाडांची आजाराची तपासणी अशा सर्व आजारांच्या तपासणी व उपचार या ठिकाणी करण्यात आली .आलेल्या सर्व शिबिरार्थी रूग्णांना मोफत गोळ्या औषधे दिल्या. ज्या रूग्णांना शस्त्रक्रीया करण्याची आवश्कता आहे. अशा रूग्णांना महात्मा ज्योतीराव  फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रीयेसाठी संत जर्नादन हाँस्पिटल या ठिकाणी शस्त्रक्रीया होणार आहे.

या कार्यक्रमात शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या शहरप्रमुख पदाचा वर्षपुर्ती सोहळा संपन्न होवुन वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा पुरवणी प्रकाशित करण्यात आली आहे.या कार्यक्रमासाठी सपनाताई मोरे नगरसेविका उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी,वर्षा शिंगाडे नगरसेविका,राखीताई विसपुते शहर प्रमुख महिला आघाडी,अश्विनिताई होने उपशहर प्रमुख महिला आघाडी,विशाल झावरे विक्रांत झावरे ,सुनिल भैय्या तिवारी सचिव युवा सेना विस्तारक शिर्डी लोकसभा ,नगरसेवक विरेन बोरावक,डाॅ.अनरुध्द काळे,राहुल देशपांडे ,योगेश मोरे शिव व्यापारी सेना,बाळासाहेब साळुंके शहर संघटक, विकास शर्मा उपशहरप्रमुख, विक्रांत झावरे,राहुल देशपांडे ग्राहक संरक्षण उपशहर प्रमुख,सतीश शिंगाणे, वैभव गिते शहर सहसंघटक, ,अमजद शेख शिवा वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख, शैलेश वाघ विभाग प्रमुख बेट, जाफर शेख शिवा वाहतुक सेना शहर प्रमुख, राकेश वाघ शिव वाहतुक सेना उपशहर प्रमुख, ऋषिकेश पवार, पवन वाघ, गौरव गुप्ता,गुरमित सिंग दडियाल,राजेंद्र सावतडकर,राहुल हंसवाल,प्रमोद बोथरा,उमेश धुगाणी,करन सोनवणे,सागर महाजन,विक्रांत खर्डे,. मिलिंद जोशी, अलोक तिवारी,सतिष डुकरे,साइ लोखडे,सतिष देशपांडे,राँबिन सिंग,गणेश पाटील,शुंभम घोडेराव,गणेश जाधव,दिपक राजपुत्र,जित गर्जे,मनिष कुवार,कैलास शिंदे,विवेक रोकडे,रोहन शिंदे,प्रशांत चौधरी, तुषार भगत,सुनिल शर्मा अक्षय शिंदे आणि सर्व शिवसैनिक ,शाखा प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कलविदर डडियाल म्हणाले की,राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले असुन,कोरोनाच्या संकटानंतर गोर गरिबांच्या आर्थिक अडचणी मुळे शिबिराचे आयोजन केले आहे.यामुळे गरिब नागरिकांना याचा लाभ होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.या शिबिराचा नागरिकांना लाभ होत आहे.येथून पुढेही असेच कार्यक्रम आयोजित करणार आहोत.



  या शिबिरासाठी श्री.जर्नादन हाँस्पीटलचे ३० ते ३५ कर्मचार्याचा स्टाफ उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अस्लमभाई शेख यांनी मानले आहे.सदरचा कार्यक्रम निवारा हौ.सोसायटी येथील कोयटे विद्यालयात संपन्न झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत