कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव शहर हद्दीत शहर पोलिसांनी अंदाजे दोन लाख ५९ हजार रुपये किमतीची १९ मोठी व चार लहान असे एकूण तेवीस जातीचे भाकड जनावरे...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगाव शहर हद्दीत शहर पोलिसांनी अंदाजे दोन लाख ५९ हजार रुपये किमतीची १९ मोठी व चार लहान असे एकूण तेवीस जातीचे भाकड जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने स्वतःकडे बाळगत असताना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील मुजाकिर कुरेशी रा. संजय नगर व चम्मू हुसेन रा. आपना बेकरी शेजारी यांच्याकडे मंगळवार दि २८ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास १२ हजार रुपयाची जर्सी गाय, ११ हजार रुपयाची जर्सी गाय, १४ हजार रुपयाची लहान जर्सी गाय, १२ हजार रुपयाची जर्सी गाय, १३ हजार रुपयेची जर्सी गाय, ४० हजार रुपये रुपयेच्या दोन मोठ्या जर्सी गायी, १२ हजार रुपयाची एक जर्सी गाय, १२ हजार रुपयांची एक जर्सी गाय, ११ हजार रुपये ची गावठी गाय, १० हजार रुपयाची लाल काळी गाय, १० हजार रुपयाची काळी गाय, १४ हजार रुपयाची पांढरी गाय, १० हजार रुपयेची काळी गाय, १३ हजार रुपयेची पांढरी गाय, १२ हजार रुपयांची काळी गाय, ११ हजार रुपयाची पांढरी गाय, ६ हजार रुपयाचे वासरू,६ हजार रुपयेचे काळे वासरू, ६ हजार रुपयेचे काळ्या पांढऱ्या रंगाचे वासरू, १ हजार रुपयाचे पांढऱ्या रंगाचे वासरू असे तेवीस गोवंश जातीची जनावरे अंदाजे दोन लाख ५९ हजार रुपयाची आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे।
सदर आरोपी वर स्वतःच्या फायद्यासाठी गोवंश भाकड जनावरांना क्रूरपणे वागणूक देऊन कत्तलीचा उद्देशाने स्वतःजवळ जखमी अवस्थेत बेकायदेशीररित्या बाळगताना मिळून आले म्हणून त्यांच्याविरुद्ध भादवि ४२९ भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागवण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ह) व महा प्राणी सर. का व सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब) ९ प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल डी.आर.तिकोने हे करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत