राहूरी फॅक्टरी(वेबटीम):- येथील तनपुरे साखर कारखाना आंदोलकांनी प्रवरा कारखान्याच्या कामगार काळे फासल्याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम):-
येथील तनपुरे साखर कारखाना आंदोलकांनी प्रवरा कारखान्याच्या कामगार काळे फासल्याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी ७ कामगारांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.
अविनाश खर्डे नामक प्रवरा कारखान्याच्या हिशोबनिसास तनपुरे कारखाना कामगारांनी काळे फासले होते. याप्रकरणी खर्डे यांच्या फिर्यादीवरून इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे, सुरेश तनपुरे, नामदेव शिंदे यांच्यासह इतर कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आंदोलन सुरूच होते. आंदोलन मिटवण्यासाठी माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी यशस्वी मध्यस्थी करून आंदोलकांना चेअरमन , व्हाईस चेअरमन यांच्या सह्यानिशी दिलेल्या लेखी पत्रात कामगारांवरील गुन्हा मागे घेण्याचे नमुद करण्यात आले होते.
दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा तनपुरे कारखाना कामगारांना राहुरी पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली.
सकाळी हा प्रकार कामगार बांधवांना समजताच तनपुरे कारखाना प्रवेशद्वारावर कामगारांनी एकत्रित येऊन संताप व्यक्त केला.
*किराणा दुकान फोडले*
दुसरी घटना देवळाली प्रवरा शहरात घडली असून राजेंद्र उंडे यांच्या मालकीचे किराणा दुकान अज्ञात चोरट्यानी उचकटून लाखो रुपयांचा किराणा माल लंपास केला आहे.
नव्याने आलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना एकप्रकारे चोरट्यांनी आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत