राहुरी फॅक्टरी(वेबटीम) डॉ.अनंतकुुमार शेेकोकार(संशोधनकर्ता) येथील विवेकानंद आयुर्वेदमहाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.अनंतकुमार शेक...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
डॉ.अनंतकुुमार शेेकोकार(संशोधनकर्ता)येथील विवेकानंद आयुर्वेदमहाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.अनंतकुमार शेकोकार यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत डॉक्टरेट पदवी( पीएचडी) प्रदान करण्यात आली आहे.
डॉ.शेकोकार हे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथील शल्यतंत्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.विजय उखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्टडी द ऐप्कसी ऑफ क्षारप्लोत इन इन्फेक्टेड युंड' या विषयावर सन २०१४ पासून संशोधनात्मक अभ्यास व क्लिनिकल ट्रायल पूर्ण करून प्रबंध आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे सादर केला.
डॉ.विजय उखळकर(मार्गदर्शक)
त्या अनुषंगाने डॉ.शेकोकार यांना डॉक्टरटेट(पीएचडी) पदवी प्रदान केली आहे. डॉ.शेकोकार यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड व आयुर्वेद महाविद्यालय, राहुरी या दोन्ही महाविद्यालयातून प्रथम संशोधनकर्ता म्हणून मानांकन प्राप्त केले आहे.
डॉ.शेकोकार यांच्या यशाबद्दल नांदेडचे अधिष्ठता डॉ.वाय.आर.पाटील, राहुरीचे अधीक्षक डॉ.पागिरे, प्राचार्य डॉ.कड तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी , व कुंटुंबातील सदस्य ह्यांचे सहकार्य लाभले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत