नेवासे प्रतिनिधी-: अहमदनगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांचा नेवासे पोलीस ठाण्यातील द...
नेवासे प्रतिनिधी-:
अहमदनगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांचा नेवासे पोलीस ठाण्यातील दोन वर्षोचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करून कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात बदली झाली असून त्यांचा नेवासे पोलीस स्टेशन तसेच मित्र परिवारांच्या वतीने आयोजित निरोप समारंभात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार बोलत होते.
पोवार पुढे म्हणाले की,दाते यांनी संगमनेर तालुका, भिंगार कॅम्प नेवासे येथे संत ज्ञानेश्वर महाराज , देवगडच्या पावन भूमीत काम करण्याचं भाग्य लाभलं असून नेहमीच पोलीस दलात अभिप्रेत असे काम केले. जनतेची, कर्मचाऱ्यांशी असलेला सुसंवाद, कार्यक्षेत्रातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांनी खमकी भुमिका घेतली. यशस्वीपणे काम करुन नक्कीच नेवासे येथे बढतीवर येतील अशा शुभेच्छा व्यक्त पोवार यांनी केल्या.
सत्काराला उत्तर देताना दाते यांनी सांगितले की, जिल्ह्यात काम करत आसताना नेहमीच जबाबदारी असते परंतु सर्वांचे सहकार्य लाभत आहे . जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, शेवगाव उप विभागीय पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. जिल्ह्यातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले नक्कीच बढतीवर नेवासे येथे पुन्हा सेवेसाठी येवू अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सपोनि विजय ठाकुर,जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण, प्रेस क्लब गुरुप्रसाद देशपांडे, सुहास पठाडे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकरराव नाबदे, केंद्रिय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन गायकवाड, पवनराजे गरुड, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे उपनिरीक्षक भाटेवाल, उपनिरीक्षक पाटील जरे, पोलीस कर्मचारी शिंदे,ठोंबरे,मरकड,गिते, कानडे गावंडे, साळवे, आव्हाड, राठोड,काळे,कोळपे,कचे, गडाख,देवकाते हजारे,भवर,कुर्हाडे,केदार,भागवत,उपस्थित होते.
निरोप समारंभासाठी तालुकाभरातुन आलेले मित्र परिवार यातुनच दिसून येते उपनिरीक्षक भरत दाते यांचे काम खूप चांगले आहे- वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार नेवासे पोलीस स्टेशन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत