आंबी (वेबटीम):- राहुरी तालुक्यातील करजगाव येथील नागरिकांनी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन गावचे कुलदैवत ...
आंबी (वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील करजगाव येथील नागरिकांनी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन गावचे कुलदैवत श्री कुबेरेश्वर महादेव मंदिराचा 'क' वर्ग तीर्थक्षेत्र यादीत समावेश व्हावा यासाठी भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हंटले आहे की, श्री कुबेरेश्वर महादेव मंदिर हे समस्त ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात तसेच वर्षभर पंचक्रोशीतील भाविकांची येथे वर्दळ असते. देवस्थान व परिसराचा विकास होण्यासाठी या देवस्थानाचा क वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश होणे गरजेचे आहे.
सेच करजगाव येथील स्मशानभूमीची अवस्था दैयनीय झाली असून दशक्रिया विधीचा ओटा खराब झाला आहे. रात्रीच्या वेळी अंत्यविधी करावयाचा असल्यास पथदिवे नसल्याने नाईलाजाने अंधारात विधी करावा लागतो.याकामी ग्रामपंचायतकडे पुरेसा निधी नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून करजगाव येथील श्री कुबेरेश्वर देवस्थानचा क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून समावेश करून स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण कामास मंजुरी मिळावी, करजगावचा जलजीवन पाणी मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा करावा अशी विनंती नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती वेणूनाथ कोतकर, माजी सरपंच नवनाथ कोतकर, सरपंच शनिफ भाई पठाण, उपसरपंच गणेश कोतकर, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाबासाहेब हरिभाऊ कोतकर, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब देठे, योगेश आरंगळे, सुरेश कोतकर, विकास कोतकर, बाळासाहेब आरंगळे, त्रिंबक कोतकर, साईनाथ कातोरे, रमजान पठाण, अविनाश आरंगळे, याकूब पठाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत