राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील नाक्यावरील एका हॉटेल व्यावसायिकाने खासगी सावकारीला कंटाळून आपल्या कामगारा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील नाक्यावरील एका हॉटेल व्यावसायिकाने खासगी सावकारीला कंटाळून आपल्या कामगारांसह पलायन केले असल्याची चर्चा आहे.
सदर हॉटेल व्यावसायिक लॉगडाऊन काळात अडचणीत आला असता त्याने राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील खासगी सावकारांकडून पैसे घेतले होते. त्यानंतर त्यास वारंवार तगादा, दमबाजी सुरू झाल्याने वैतागून आपल्या कामगारांसह पलायन केल्याची चर्चा राहुरी फॅक्टरी परिसरात सुरू आहे.
दरम्यान गेल्या ४ दिवसापूर्वी टाकळीमिया येथील एका ठेकेदाराने खासगी सावकारीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असता आता फॅक्टरी परिसरातील हॉटेल व्यवसायिकाने आपले दोन्ही हॉटेल बंद करून कामगारांसह पलायन केल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा खासगी सावकारीचा विषय ऐरणीवर आला आहे.
देवळाली व फॅक्टरी परिसरातील खासगी सावकारकी रोखण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनापुढे असून त्याकडे कशा प्रकारे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे लक्ष घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत