कोपरगावमध्ये एकास गंभीर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावमध्ये एकास गंभीर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरातील साईसीटी भामानगर रस्त्यावर भागीदारीतून जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदाईचे काम सुरू होते. मात्र हे काम कमी पैशांत घ...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


शहरातील साईसीटी भामानगर रस्त्यावर भागीदारीतून जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदाईचे काम सुरू होते. मात्र हे काम कमी पैशांत घेतल्याने एका भागीदाराने दुसऱ्या भागीदारास गंभीर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (ता.२३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राहुल एकनाथ बोरकर (वय ३४, रा.येसगाव) आणि सागर बाळासाहेब लोंढे, आकाश बाळासाहेब लोंढे (रा.कोकमठाण) यांनी भागीदारीमध्ये साईसीटी भामानगर येथे जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदाईचे काम घेतले होते. मात्र, कमी पैशांत हे काम घेतल्याचा राग आल्याने सागर व आकाश लोंढे यांनी राहुल बोरकर यांना लोखंडी गजाने गंभीर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राहुल बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं.२९५/२०२१ भादंवि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.डी. आर.तिकोने हे करत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत