काळे-कोल्हेंनी पालखी मार्गासाठी मंजुरी घ्यावी नितीन शिंदे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

काळे-कोल्हेंनी पालखी मार्गासाठी मंजुरी घ्यावी नितीन शिंदे

कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव-सावळीविहीर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग मंजुरीसाठी आजी-माजी आमदार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी अहम...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


कोपरगाव-सावळीविहीर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग मंजुरीसाठी आजी-माजी आमदार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी अहमदनगर येथे आलेले असताना त्यांच्याकडे श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत. पंरतु, या महामार्गावर अतिरिक्त जमीन अधिग्रहण करुन पालखी मार्गासाठी मंजुरी घेण्यासाठी केंद्र सरकारला राजी करावे, अशी मागणी कोपरगाव तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे.

कोपरगाव-सावळीविहीर हा नियोजित महामार्ग नव्याने होत असताना दर गुरुवारी, रामनवमी व गुरूपौर्णिमा निमित्ताने पायी वारी करणार्‍या भाविकांच्या दृष्टीने हे काम होणार नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटरमध्ये तीन लेन एका बाजूने म्हणजेच सहा पदरी रस्ता होणार असणार आहे. परंतु, पायी, दुचाकी, बैलगाडी व सामान्य जनतेचा व साईभक्तीचा खरचं काळे व कोल्हे यांना कनवाळा असले तर नियोजित राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड करण्याबाबत आपल्या नेतृत्वाचा कस लावून अतिरिक्त जमीन अधिग्रहण करून पालखी मार्गाच्या मंजुरीसाठ केंद्र शासनास राजी करावे.  शिवाय अहमदनगर-कोपरगाव हा रस्ता पूर्वी जागतिक बँक अर्थ सहाय्याने केलेला होता. त्याचे दोन वर्षे गॅरंटी देखभालीसाठी, डागडुजीसह काम दिले गेले. त्यातील चाळीस कोटी खर्चाच्या कोपरगाव-कोल्हार कामाचे ऑडिट करावे, अशी मागणी देखील काँग्रेस तालुकाध्यक्ष शिंदे यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत