देवळाली प्रवरा / प्रतिनिधी देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने महात्मा गांधी जयंती दिवशी देवळाली प्रवरा येथे मोफत संगणकीकृत 7/12 वितरण ...
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने महात्मा गांधी जयंती दिवशी देवळाली प्रवरा येथे मोफत संगणकीकृत 7/12 वितरण सोहळा संपन्न झाल्यावर कामगार तलाठी दिपक साळवे यांनी सोमवारी पुन्हा 7/12 चे वितरणा बागाईत पिक सोसायटी मध्ये माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते करण्यात आले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींच्या प्रयत्नातून व निर्णयानुसार काल देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृह येथे महात्मा गांधी व पंडित लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोफत संगणकीकृत 7/12 वितरण करण्यात होते.
शनिवारी पार पडलेल्या संगणकीकृत 7/12 वितरण लोकनियुक्त प्रथम माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,विद्यमान उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, नगरसेवक बाळासाहेब खुरुद, संगीता चव्हाण, सुजाता कदम, संजय बर्डे, शिवसेना शहर प्रमुख सुनिल कराळे, अमोल कदम, भिमराज मुसमाडे, रवींद्र मुसमाडे, भारत शेटे,आदींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तलाठी दीपक साळवे यांनी खाते उतार्यांचं वाचन करून वर्षभरात विनातक्रार फेरफार नोंदीची माहिती दिली. सुधारित 7/12 च्या नमुन्यातील बदलांची माहिती, दि.15 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत माहिती आणि महसूल विभागाच्या इतर ऑनलाइन सुविधेबाबत माहिती दिली. यावेळी संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीत सुधारित 7/12 उपलब्ध करून देणे बाबत विशेष मोहिमेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात होता.कामगार तलाठी दिपक साळवे यांनी शनिवारी घेतलेल्या कार्यक्रमात एकमेकांचे राजकीय विरोधक असल्याने काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.नगर पालिका सभागृहात हा कार्यक्रम घेतल्याने सत्ताधारी गटातील नगरसेवक या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते.
सोमवारी सकाळी बागाईतपिक सोसायटीमध्ये माजी आ.चंद्रशेखर कदम याच्याहस्ते शुभारंभ करुन 7/12 वितरण करण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,सोपानराव शेटे, मच्छींद्र कदम,सोपानराव भांड, अशोक शेटे आदींच्या उपस्थित कामगार तलाठी दिपक साळवे यांनी सुधारित 7/12 च्या नमुन्यातील बदलांची माहिती, दि.15 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत माहिती आणि महसूल विभागाच्या इतर ऑनलाइन सुविधेबाबत माहिती दिली.
कामगार तलाठी साळवे यांना 7/12 वितरणाचा शुभारंभ दोन ठिकाणी स्वतंञ करावा लागला. राजकारणातील एक मेकांचे विरोधक असल्याने एकञ येवून 7/12 कार्यक्रम न करता स्वतंञ कार्यक्रम तलाठी यांना घ्यावा लागला.
सात बारा वितरण महिणाभर चालणार वितरणाचा दोन ठिकाणी कार्यक्रम घेतलेला नाही. परंतू शासनाची घरपोहच सात बारा योजना असल्याने माजी आ.चंद्रशेखर कदम यांना सात बारा, डिजीटल सही सातबारात जे 15 बदल झाले आहेत याची माहिती देण्यात आली सात बारा वितरणाचा दोनदा शुभारंभ केलेला नाही.असे कामगार तलाठी दिपक साळवे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत