राहुरी राहुरी येथील ३५ वर्षीय महिलेवर पारनेर तालुक्यातील एका बड्या घराण्यातील बाप लेकांनी सलग नऊ वर्षे जोर जबरदस्ती करत तसेच वेगवेगळे आम...
राहुरी
राहुरी येथील ३५ वर्षीय महिलेवर पारनेर तालुक्यातील एका बड्या घराण्यातील बाप लेकांनी सलग नऊ वर्षे जोर जबरदस्ती करत तसेच वेगवेगळे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना नूकतीच उघडकीस आली. सदर महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत पारनेर येथील भंडारी नामक बाप लेका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेवर अन्याय करणाऱ्या बाप-लेकावर कठोर कारवाई न केल्यास अनेक सामाजिक संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
राहुरी शहर हद्दीत राहणार एक ३५ वर्षीय विवाहित महिला सन २०१० पासून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील संतोष भंडारी यांच्याकडे मोल मजूरीचे काम करण्यासाठी गेले होते. सदर महिला २०१० पासून ते २०१९ पर्यंत भंडारी यांच्या घरी घरकाम करत होती. तर तिचा पती भंडारी यांच्या किराणा दुकानात मजूरीचे काम करत होता. सदर पती पत्नी त्यांच्या एका खोलीत राहत होते. काही दिवसाने संतोष शांतीलाल भंडारी याने सदर महिलेला विविध प्रकारचे आश्वासन देऊन तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध केले. हे सर्व त्याचा मुलगा राजेश संतोष भंडारी याला समजले. तो सदर महिलेला म्हणाला कि, तूझे व माझ्या वडिलांचे शारिरीक संबंध आहेत. माझ्याशीपण शारिरीक संबंध ठेव. नाहीतर हे सर्व मी सगळ्यांना सांगेन. अशी धमकी देऊन त्यानेही सदर महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. संतोष भंडारी व राजेश भंडारी या बाप लेकाकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून हा सर्व प्रकार मी माझ्या पतीला सांगणार आहे. असे सदर महिलेने त्यांना सांगितले. त्यावर त्या बाप लेकांनी तू जर आमचे नाव कोठे घेतले किंवा कोणाला काही सांगितले तर तुझ्यावर व तूझ्या पतीवर चोरी आणि इतर खोटे गुन्हे दाखल करून अडकवून टाकू. अशी धमकी दिली. आणि तिच्यावरील अत्याचार चालूच ठेवले.
बाप लेकाच्या अत्याचाराला कंटाळून सदर महिला व तिच्या पतीने टाकळी ढोकेश्वर सोडून राहुरीत आले. दरम्यान सदर महिलेने १५ मार्च २०२१ रोजी पारनेर पोलिस ठाण्यात लेखी स्वरूपाची तक्रार दिली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान संतोष भंडारी व राजेश भंडारी आणि नगर येथील एका राजकीय पुढाऱ्याने सदर महिलेला समक्ष बोलावून तू तक्रार मागे घे. नाहीतर तूला व तूझ्या कुटुंबाला गायब करुन मारून टाकू. अशी धमकी देऊन तिच्या पतीला मारहाण केली. सदर महिलेने राहुरी पोलिसात धाव घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष शांतीलाल भंडारी व त्याचा मुलगा राजेश संतोष भंडारी दोघे राहणार टाकळी ढोकेश्वर तालूका पारनेर या बाप लेका विरोधात वारंवार बलात्कार करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच सदर गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय.
दरम्यान महिलेला न्याय मिळवण्यासाठी अनेक संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत