निवडणूक जवळ आली म्हणून जनतेची फसवणूक करु नका - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निवडणूक जवळ आली म्हणून जनतेची फसवणूक करु नका

कोपरगाव/प्रतिनिधी:-    कोपरगाव नगरपरिषदेच्या दोन नगरसेवकांनी आम्ही तुमच्यासाठी दोघेही मिळून 10 लाख रुपये नगरसेवक निधी देत आहोत अशी थाप मारली...

कोपरगाव/प्रतिनिधी:-   


कोपरगाव नगरपरिषदेच्या दोन नगरसेवकांनी आम्ही तुमच्यासाठी दोघेही मिळून 10 लाख रुपये नगरसेवक निधी देत आहोत अशी थाप मारली आहे. याबाबत तसे संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. यावर निशाणा साधत निवडणूक जवळ आली म्हणून जनतेची किती फसवणूक करणार? असा सवाल कोपरगावचे भाजपचे विनायक गायकवाड यांनी केला आहे.




याबाबत अधिक बोलताना गायकवाड म्हणाले, वास्तविक शहरात आता वैशिष्ट्यपूर्ण कामे विशेष अनुदान - ठोक तरतूद योजना, अनुदान व नगरपरिषद निधी अंतर्गत निधी या निधीतून होत आहेत. खरेतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अशा कामांचे श्रेय घ्यायला पाहिजे. पण ते कधीही स्वतः असे श्रेय घेत असल्याचे दिसत नाही. वास्तविक पालिकेमार्फत होणार्‍या प्रत्येक लहान-मोठ्या कामांचे श्रेय नगराध्यक्ष वहाडणे यांनी घ्यायला काहीच हरकत नाही. त्याउलट कोल्हे गटाचे दोन शिवसेना नगरसेवक मात्र नगरसेवक निधी असा काही प्रकार नसतानाही श्रेय घेण्याची केविलवाणी धडपड करत आहेत. यावरुन जनतेनेही आता लक्षात घेतले पाहिजे की काहीजण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवेदने, मागण्या सोशल मीडियाद्वारे फिरवून आम्हीच खरे तळमळीचे असे भासविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, जनतेने अशा प्रवृत्तींना ओळखले पाहिजे. नगरपरिषदेकडून होणार्‍या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे सध्या काही बोलत नाहीत याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये असा इशारा भाजपचे विनायक गायकवाड यांनी दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत