सोनगाव/वेबटीम:- ब्रह्माकुमारीज् कोल्हार सेवाकेंद्र (महाराष्ट्र) च्या मूल्य शिक्षकांद्वारे अध्यात्म आणि मूल्य-शिक्षण क्षेत्रात अनोखा ऑनलाइन...
सोनगाव/वेबटीम:-
ब्रह्माकुमारीज् कोल्हार सेवाकेंद्र (महाराष्ट्र) च्या मूल्य शिक्षकांद्वारे अध्यात्म आणि मूल्य-शिक्षण क्षेत्रात अनोखा ऑनलाइन वार्षिक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये "श्रेष्ठ पुरुषार्थी स्पर्धा" (२०२०-२०२१) घेण्यात आली.
स्पर्धेत कोल्हार सेवा केंद्रातील मूल्य शिक्षकांद्वारे 'कोण होणार पद्मापद्मपती', 'सुपर पुरूषार्थी' सारख्या उपक्रमांची साखळी पुढे वाढवित तसेच श्रेष्ठ पुरूषार्थी, राजयोगी, आदरणीय ब्र.कु.जगदीशभाईजींच्या १२ मे २०२० च्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्पर्धेत मनुष्यांमध्ये
जीवनमूल्ये रुजवणे, आध्यात्मिक ज्ञानासह, आध्यात्मिक-चिंतन वाढवणारी मनोरंजनात्मक प्रश्नावली घेण्यात आली. या स्पर्धेत संपूर्ण भारतातील २० विविध राज्यांतून सुमारे ७५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, तसेच सुमारे २०० स्पर्धकांनी नियमितपणे सहभाग घेत वर्षअखेरपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धकांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. जीवनातील मूल्यांचे महत्त्व, वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर यश आणि कल्याण या सर्व मूल्यांची संकल्पना लक्षात घेऊन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये, विशेषत: बदलती जीवनशैली, जगातील मूल्यांचा होणारा ऱ्हास, अध्यात्मापासून दूर जाणारी आधुनिक पिढी, या सर्व वाढत्या परिस्थितीत, मानवी आरोग्य, आध्यात्मिक हित, खेळांतील आध्यात्मिक शक्तींची कल्पना समोर ठेवून खेळ, इ. चाचणी आणि स्व-परिवर्तन याबाबत देखील काळजी घेण्यात आली. स्पर्धेसाठी सर्व उद्दिष्टांच्या दृष्टिकोनातून स्पर्धेत विविध प्रश्नमंजूषा, उपक्रमांद्वारे आध्यात्मिक आणि मूल्याधिष्ठित प्रगती साधण्याचा यशस्वी प्रयत्न होता. तसेच ३ राष्ट्र-स्तरीय आणि ३ राज्य-स्तरीय यश मिळवणाऱ्या उत्तीर्ण स्पर्धकांसह सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांची सन्मान यादी देखील निकालाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली. ३ वार्षिक श्रेष्ठ-पुरूषार्थी विजेता, १ अव्यक्त-सितारा आणि १ भाग्यवान-सितारा निवडून विजेत्यांचा वर्षाच्या शेवटी ऑनलाइन-सत्कारही करण्यात आला. स्पर्धा-प्रश्नोत्तरांसोबतच बुद्धिला खेळांच्या माध्यामातून आध्यात्मिक मुल्यनिष्ठ वळण देण्यासाठी २५ विविध खेळ किंवा उपक्रम घेण्यात आलेत, ज्यांमध्ये वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन, शब्द-खेळ, अव्यक्त रूप मेरा स्वरूप, ऑनलाइन लुडो गेम, साप-शिडी, दिव्य अंताक्षरी, आध्यात्मिक क्रिकेट यासारखे अनोखे खेळ आयोजित करून एक प्रकारे विश्व विक्रमच केलाय.... मूल्यशिक्षकांनी रस घेत मोठी कामगिरी बजावली आणि स्पर्धकांमध्ये मूल्यांची रूजवात केली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ब्रह्माकुमार सुरेंद्रभाईंनी विशेष मार्गदर्शन व योगदान दिले. प्रशासकीयदृष्ट्या राजयोगी बी.के.शिवाजीभाई आणि राजयोगिनी बी.के. पद्मावती दीदी आणि स्वाती दीदी यांनी काम पाहिले. प्रशासनात राजयोगी ब्रह्माकुमार सुरेंद्र भाई आणि राजयोगिनी ब्रह्माकुमारी पद्मावती दीदी यांनी विशेष सेवा पुरविल्या. ब्र.कु. सुषमा, ब्र.कु.श्वेता आणि ब्र.कु.विजयभाई यांनी सहाय्य केले. स्पर्धेच्या यशस्वी व उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे. या स्पर्धेचे विविध देशांसह भारतातील एकूण २० राज्यांतील स्पर्धकांनी कौतुकाचा वर्षाव केला. आजच्या घडीला देखील नियमित सुरु असलेल्या कोरोना काळाच्या तणावपूर्ण वातावरणात अध्यात्मिक स्पर्धेने मात्र उत्साहाचे वातावरण निर्माण करून प्रत्येकाला दिलासा दिला. स्पर्धेचे शिल्पकार राजयोगी ब्र.कु. सुरेंद्रभाई यांनी इंटरनेट आणि इतर सेवा पुरवणाऱ्या विशेष तंत्रज्ञानातील गुगल कंपनीचेही आभार मानले. त्यांनी स्पर्धेचे श्रेय ऑनलाइन व्यासपीठाला देताना सर्व सहभागींना मनापासून धन्यवाद दिले. अशा अनोख्या ऑनलाइन स्पर्धेचा उपक्रम तणावाला सामोऱ्या जाणाऱ्या जगात राबविणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या शिक्षण क्षेत्रात, राजयोग एज्युकेशन-अँड-रिसर्च फाउंडेशनच्या शिक्षण-विभागाचे कायम महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्याचप्रमाणे भविष्यातही शिक्षण विभाग आणि संस्थेला प्राधान्य देऊन मानवी कल्याणासाठी जीवनमूल्ये आणि अध्यात्म, सहकार्य, वैयक्तिक, सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये जीवनमूल्यांची गरज भागविण्यासंबधी आयोजक संघ कोल्हार सेवा केंद्र सज्ज राहील. त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, माउंट आबू येथील आंतर्राष्ट्रीय मुख्यालयातील, शिक्षा प्रभाग - आरइआरएफ, मूल्य शिक्षा निर्देशक राजयोगी ब्रह्माकुमार पाण्डियामणिजी यांनी सर्व आयोजकांचे आभार मानून ह्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व काळाची गरज ओळखून पुढील सेवेसाठी अनेकानेक शुभेच्छा व आशिर्वाद दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत