अतिवृष्टीमुळे नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे करून भरपाई द्यावी_स्नेहलता कोल्हे. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अतिवृष्टीमुळे नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे करून भरपाई द्यावी_स्नेहलता कोल्हे.

कोपरगाव प्रतिनिधी:-     कोपरगांव विधानसभा मतदार संघात झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला घास  निसर...

कोपरगाव प्रतिनिधी:-


   कोपरगांव विधानसभा मतदार संघात झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला घास  निसर्गान हिरावला, त्यातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले तेंव्हा झाल्याने नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाच्या सचिव  स्नेहलता  कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.




  सौ. कोल्हे यांनी या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भूसे, पालक मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द् भोसले, तहसिलदार विजय बोरुडे यांचेकडे दिले आहे.



  सौ कोल्हे महणाल्या की, कोपरगाव मतदार संघात  २७, २८ सप्तेबर व ८ ऑक्टोंबर रोजी अतिवृषटी व गारपीटमुळे काढणीस आलेली सोयाबीन, बाजरी, कपाशी, मका, ऊस, लाल कांदा, कांदारोपे आदी  पिके पावसाने उधुस्त्व झाली आहे. फळबागाना देखील फटका बसला आहे, हातातोंडाशी आलेला घास निसर्गानि हिरावला आहे, यावर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांना नुकसानीचा ठरला आहे. कोरी ना महामारीमुळे शेतकरी  मेटाकुटीला आला आहे, प्रशलेले आहे. दसरा,दिवाळी  सणासुदीच्या तोंडावर मोठे नुकसान झालेले आहे त्यांची दिवाळी अंधारात जावु नये यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे,  पंचनामे होत नाही, तेव्हा या शेतकऱ्याना नुकसानीचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यासबंधित आदेश करावे असे सौ. कोल्हे  म्हणाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत