लायन्स क्लब व लिओ क्लबची साई आश्रयालयाला मदत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लायन्स क्लब व लिओ क्लबची साई आश्रयालयाला मदत

कोपरगाव/प्रतिनिधी:- सामाजिक बांधिलकीचे ब्रीद घेऊन कार्यरत असणार्‍या लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि लिओ क्लबने नुकतीच शिर्डी येथील साई आश्रयाला भ...

कोपरगाव/प्रतिनिधी:-



सामाजिक बांधिलकीचे ब्रीद घेऊन कार्यरत असणार्‍या लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि लिओ क्लबने नुकतीच शिर्डी येथील साई आश्रयाला भेट देत मदत केली आहे. 


समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने लायन्स क्लब ऑफ कोपरगाव कायमच वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिर्डी येथील साई आश्रयालयाला येथे भेट दिली. यावेळी येथील 112 मुले आणि 50 वृद्धांना मास्क, साबण, तेल, टूथपेस्ट, व्हिक्स, झंडूबाम, व्हिटॅमिन व वेदनाशामक गोळ्या, डायपर तसेच ग्लुकॉन-डी पावडर अशा दैनंदिन उपयोगी वस्तूंचे वाटप केले. यावेळी आश्रयालयाचे संचालक गणेश दळवी, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष राम थोरे, सचिव अक्षय गिरमे, खजिनदार सुमित भट्टड, नितीन भडकवाडे, परेश उदावंत, अक्षय बोरा, रुपेश शिरोडे, लिओ क्लबचे अध्यक्ष आदित्य गुजराथी, ध्रुव कुदळे, राहुल नाईक, देवेन चोप्रा आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत