स्नेहलता कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त अमरधाममध्ये बसविले हायमॅक्स दिवे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्नेहलता कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त अमरधाममध्ये बसविले हायमॅक्स दिवे

कोपरगाव/प्रतिनिधी:- स्नेहलता कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त अमरधाममध्ये बसविले हायमॅक्स दिवे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता...

कोपरगाव/प्रतिनिधी:-




स्नेहलता कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त अमरधाममध्ये बसविले हायमॅक्स दिवे

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता.८) संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांच्यावतीने अमरधाममध्ये हायमॅक्स दिवे बसविण्यात आले.



माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कामाच्या माध्यमातून जनमानसांत वेगळा ठसा उमटविला आहे. याच धर्तीवर रात्रीच्या अंत्यविधीला उजेडाची सोय नव्हती. ही गोष्ट लक्षात घेऊन समस्येचे उच्चाटन करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक सिद्धार्थ साठे, रोहित कणगरे, रामदास गायकवाड, महेंद्र नाईकवाडे, सागर राऊत, वासुदेव शिंदे, योगेश वाघ, रितेश परजणे, राहुल माळी, ऋषी निकम आदी युवा सेवकांनी अमरधाममध्ये हायमॅक्स लावले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत