कोपरगाव/वेबटीम:- शहरातील अतिक्रमण करून अवैध कत्तल खाने त्वरित काढून घ्यावे अशी नोटीस देऊनही ते काढले नाहीत म्हणून नगर पालिकेने मोठा खर्च करू...
कोपरगाव/वेबटीम:-
शहरातील अतिक्रमण करून अवैध कत्तल खाने त्वरित काढून घ्यावे अशी नोटीस देऊनही ते काढले नाहीत म्हणून नगर पालिकेने मोठा खर्च करून ते काढावे लागले मात्र या अतिक्रमण मोहिमेचा सर्व खर्च संबंधित अतिक्रमण धारकांकडून वसूल करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरातील कत्तल खाने बंद व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली नगर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराबाहेर आधुनिक कत्तलखाना उभारणी केली मात्र या ठिकाणी केवळ म्हैस वर्गीय प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी देण्यात आली शासनाने गोवंश हत्येस प्रतिबंध करणारा कायदा केला त्यामुळे त्या ठिकाणी गोवंशाची कत्तल करता येत नाही म्हणून कोपरगाव शहरात अनेक अवैध कत्तलखाने सुरू होते मागील दोन वर्षांच्या काळात या अवैध कत्तलखान्या मध्ये अवैध रित्या गो वंशाची हत्या होत होती त्यामुळे नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता नगर पालिकेने हे अवैध कत्तल खाने व अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटिसा बजवल्या या पूर्वी देखील नगर पालिकेने या परिसरात कत्तली साठी आणलेली जनावरे कटवनात बांधून ठेवली जातात म्हणून मोठा फौज फाटा नेऊन ते काटवन उध्वस्त केले त्या नंतर त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी राहत्या घराजवळ अवैध बेकायदा बांधकामे करून गो वंशाची कत्तल केली जाते त्यामुळे हे बांधकाम काढून घ्यावे म्हणून संबंधितांना नोटिसा पाठवल्या मात्र या लोकांनी नगर पालिकेच्या नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे नाईलाजास्तव नगर पालिकेला पोलिसांच्या मदत्तीने जेसीबी,ट्रॅक्टर,मालवाहू गाड्या,नगर पालिका कर्मचारी,पोलीस अधिकारी नेऊन ही अतिक्रमणे काढावी लागली त्या साठी नगर पालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असून रीतसर नोटीस देऊनही ही अतिक्रमणे काढण्यास टाळाटाळ केली व विनाकारण नगर पालिकेला मोठा खर्च करावा लागला या खर्चात छोटी मोठी विकास कामे झाली असती मात्र सर्वसामान्य नागरिक कर रूपाने भरत असलेल्या रकमेचा विनियोग हा नागरिकांना सुख सुविधा देण्यासाठी होणे अपेक्षित असते मात्र हेच पैसे अशा प्रकारे खर्च करायची नामुष्की नगर पालिकेवर ओढवली आहे त्यामुळे अशा जुजबी कारवाया करत असताना त्या वर होणारा खर्च देखील संबंधित अवैध धंद्या करिता अतिक्रमण करून अवैध बांधकाम करणारा कडून वसूल करण्यात यावा असे केल्यास पुन्हा असे अतिक्रमण होण्यास नक्कीच चाप बसेल व नगर पालिकेचा खर्च झालेला पैसा वसूल होईल असेही या पत्रकात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत