सरपंच सेवा संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी साबळे-पावसे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सरपंच सेवा संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी साबळे-पावसे

कोपरगाव-वेबटीम कोपरगाव येथील शैक्षणिक सामाजिक कार्यात कार्यरत असलेले ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच...

कोपरगाव-वेबटीम



कोपरगाव येथील शैक्षणिक सामाजिक कार्यात कार्यरत असलेले ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांची राज्य संपर्क प्रमूख पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी दिली आहे.





आधीक माहिती देतांना पावसे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्य करत असते. संघ दरवर्षी राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या लोकांचा गुणगौरव करत असते. तसेच राज्यभरातील प्रत्येक गावच्या सरपंचा ना सोबत घेत गाव विकासासाठी शासन स्तरावर विविध मागण्या करत झगडत असते. 



नुकताच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आशीर्वादाने राज्यभरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सरपंचना प्रोत्साहित केले.त्यामुळे एक ना अनेक अशा सामाजिक कार्यात अग्रेसर  असणाऱ्या सरपंच सेवा संघाच्या व्यापक स्वरूपातील वाढीसाठी कोपरगाव येथील परशराम साबळे यांची राज्य संपर्क प्रमूख पदी निवड करण्यात आली असून साबळे आपल्या पदाचा उपयोग नक्कीच सामाजिक हितासाठी करतील यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत